पदवीधर विज्ञान शिक्षक पदोन्नती जुलै अखेर करणार: वैशाली झणकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 06:27 PM2019-07-13T18:27:27+5:302019-07-13T18:28:40+5:30
विज्ञान शिक्षक पदवीधर पदोन्नती जुलै अखेर पर्यंत करणार असल्याचे आश्वासन शिक्षणाधिकारी वैशाली झणकर वीर यांनी विज्ञान समन्वय समतिीस दिल्याने नाशिक जिल्हा परिषदे अंतर्गत विज्ञान विषय समुहाची ६०० च्या वर असलेली रिक्त पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
नांदगाव : विज्ञान शिक्षक पदवीधर पदोन्नती जुलै अखेर पर्यंत करणार असल्याचे आश्वासन शिक्षणाधिकारी वैशाली झणकर वीर यांनी विज्ञान समन्वय समतिीस दिल्याने नाशिक जिल्हा परिषदे अंतर्गत विज्ञान विषय समुहाची ६०० च्या वर असलेली रिक्त पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सन २०१९ च्या पहिल्या तिमाहीत सदर भरती प्रक्रि या राबविण्यात येणार होती. मात्र लोकसभा आचारसंहिता सुरु झाल्याने तिला स्थिगती देण्यात आली होती. शिक्षणाधिकारी यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गीते यांच्याशी या विषयावर सविस्तर चर्चा करून विज्ञान पदोन्नती प्रक्रि या राबविणे संदर्भात औपचारिक परवानगी घेतली आहे.
जिल्हा परिषदे अंतर्गत इ ६ वी ते ८ वी च्या वर्गांसाठी बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील तरतुदी नुसार उच्च प्राथमिक शाळेत विज्ञान, भाषा आणि समाजशास्त्र या विषय संवर्गातील प्रत्तेकी एक या प्रमाणे प्रशिक्षित पदवीधर अर्हता धारक शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात याव्यात अशी तरतूद आहे.
नाशिक जिल्हा परिषदे अंतर्गत विज्ञान विषय समुहाची ६०० च्या वर पदे रिक्त असून शासन निर्णय १३ आॅक्टोबर २०१६ नुसार विज्ञान विषयाचे पदवीधर शिक्षक उपलब्ध नसल्यास कार्यरत शिक्षकां मधून जे शिक्षक १२ वी विज्ञान व डी एड असतील अशा शिक्षकांची पदस्थापना विज्ञान पदवीधर शिक्षकांच्या जागे वर करण्यासाठी यावी असा निर्णय आहे. अहमदनगर, उस्मानाबाद, पालघर, जळगाव अशा अनेक जिल्ह्यां मध्ये ही प्रक्रि या २०१७ मधेच पूर्ण करण्यात आलेली असतांना नाशिक जिल्ह्यात ती अद्याप राबवलेली नाही.