कांदा निर्यातबंदी उठविण्यासाठी बच्चू कडू यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 10:32 PM2020-02-13T22:32:06+5:302020-02-14T00:44:05+5:30

दिवसेंदिवस कांद्याच्या ढासळत्या बाजारभावाने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक कोंडीतून सावरण्यासाठी शासनाने कांदा निर्यादबंदी तत्काळ उठविण्याची मागणी प्रहार संघटनेच्या पदाधिकारी व शेतकºयांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Bachu Kadu to raise onion export ban | कांदा निर्यातबंदी उठविण्यासाठी बच्चू कडू यांना साकडे

कांदा निर्यातबंदी उठविण्यासाठी बच्चू कडू यांना निवेदन देताना गणेश निंबाळकर, प्रकाश चव्हाण, भूषण बच्छाव, हरिभाऊ महाजन, वसंत झांबरे आदी.

googlenewsNext
ठळक मुद्देप्रहार संघटनेचे पदाधिकारी, शेतकऱ्यांनी दिले निवेदन

जळगाव नेऊर : दिवसेंदिवस कांद्याच्या ढासळत्या बाजारभावाने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक कोंडीतून सावरण्यासाठी शासनाने कांदा निर्यादबंदी तत्काळ उठविण्याची मागणी प्रहार संघटनेच्या पदाधिकारी व शेतकºयांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दररोज ढासळणाºया बाजारभावाबाबत चिंता व्यक्त करीत निर्यातबंदीसह कांद्यावर केंद्र सरकारने लादलेली सर्व बंधने तत्काळ हटवून तातडीने निर्यातीस प्रोत्साहन देण्यात यावे, अशी मागणी यावेळी शिष्टमंडळाने केली. आगामी काळात एकट्या नाशिक जिल्ह्यातून ५४ लाख मेट्रिक टन कांदा उत्पादन अपेक्षित असून, साठवण क्षमता अकरा लाख मेट्रिक टन इतकीच असल्याने नाईलाजाने उर्वरित कांदा शेतकºयांना बाजारात आणावाच लागेल. परिणामी मागणीपेक्षा पुरवठा वाढून कांदा मातीमोल दराने विक्र ी होण्याची भीती शिष्टमंडळाने व्यक्त केली. यावेळी प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश निंबाळकर, चांदवड तालुकाध्यक्ष प्रकाश चव्हाण, मालेगाव तालुकाध्यक्ष भूषण बच्छाव, येवला तालुकाध्यक्ष हरिभाऊ महाजन, अमोल फरताळे, उपाध्यक्ष वसंत झांबरे, शंकर गायके, गणेश लोहकरे, सचिन पवार, गणेश तिडके, गोरख निर्मळ, रामभाऊ नाईकवाडे, दत्तू बोरणारे, वैभव गांगुर्डे, निवृत्ती न्याहारकर, निवृत्ती पवार, सुभाष खैरे, ज्ञानेश्वर पवार, किरण काटे, किरण जाधव, अण्णासाहेब चरमळ, राजेंद्र देवरे आदी उपस्थित होते.

Web Title: Bachu Kadu to raise onion export ban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.