नगर परिषदेच्या लिपिकांचे उपोषण मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 12:58 AM2019-03-18T00:58:02+5:302019-03-18T00:58:21+5:30
त्र्यंबकेश्वर : नगर परिषदेच्या श्याम सुभाष गोसावी व प्रकाश विनायक देशमुख या दोन लिपिकांनी मुख्याधिकाऱ्यांनी रजेच्या कालावधीतील वेतन नाकारल्याविरोधात नगरपालिका कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले. यानंतर त्यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन उपोषणाची सांगता करण्यात आली.
त्र्यंबकेश्वर : नगर परिषदेच्या श्याम सुभाष गोसावी व प्रकाश विनायक देशमुख या दोन लिपिकांनी मुख्याधिकाऱ्यांनी रजेच्या कालावधीतील वेतन नाकारल्याविरोधात नगरपालिका कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
नगर परिषद कर्मचाऱ्यांची रजा शिल्लक असताना आजारपणातील रजा विनावेतन करणे ही बाब अन्यायकारक आहे, असे या लिपिकांनी नगरपालिकेला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. रजा शिल्लक असल्यावर वेतन मिळालेच पाहिजे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
त्र्यंबकेश्वर नगर परिषद ही तीर्थस्थान पालिका असून, येथे यात्रा जत्रा सण वाराच्या दिवशी कर्मचाऱ्यांना सुटीच्या दिवशीदेखील कार्यालयात काम करावे लागते. सुटीच्या दिवसाच्या कामाचा पगारदेखील कर्मचाºयांना मिळत नाही. नियमानुसार रजा मागितल्यास रजा मिळत नाही. तसेच सुख-दु:खाच्या प्रसंगी अचानक स्वत:ची, कुटुंबीयांची अथवा नातेवाइकांची प्रकृती ठीक नसल्यास रजेवर जावे लागते. अशा प्रसंगी रजेचा अर्ज पाठविला तर रजा नामंजुर करण्यात येते व विनावेतन धरली जाते, हे अन्यायकारक आहे. उपोषणार्थी श्याम सुभाष गोसावी यांचे चार महिन्यांचे तर प्रकाश विनायक देशमुख यांचे १९ महिन्यांचे वेतन दिलेले नाही. दरम्यान, उपोषणार्थी कर्मचाºयांना इतर कर्मचाºयांनीही पाठिंबा दिला आहे.
रविवारी उपोषणाच्या तिसºया दिवशी दुपारी तीन वाजेच्या सुमारास मुख्याधिकारी नगर परिषद कार्यालयात दाखल झाल्या. त्यानंतर विद्यमान नगरसेवक त्रिवेणी तुंगार- सोनवणे, माजी नगराध्यक्ष ललित लोहगावकर व योगेश तुंगार यांनी मुख्याधिकाºयांशी याबाबत चर्चा केली. यानंतर स्थायी समितीच्या सदस्य माधवी भुजंग, शिल्पा रामायणे व भारती बदादे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन स्थायी समितीवर दाद मागून मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले. यानंतर त्यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन उपोषणाची सांगता करण्यात आली.