अंबिका ओझरच्या शेतकऱ्यांचे उपोषण मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2019 12:51 AM2019-02-07T00:51:11+5:302019-02-07T00:51:53+5:30
कळवण : तालुक्यातील देवळी वणी लघु पाटबंधारे प्रकल्पातून रब्बी पिकासाठी तत्काळ आवर्तन मिळावे, या मागणीसाठी अंबिकाओझर येथील आदिवासी शेतकºयांनी लघु पाटबंधारे कळवण कार्यालयासमोर मंगळवारपासून सुरु केलेले बेमुदत उपोषण बुधवारी (दि.६)नायब तहसीलदार डॉ. व्यकंटेश तुप्ते व पाटबंधारे विभागाच्या लेखी आश्वासननंतर उपोषण मागे घेतले.

देवळीवणी लघुपाटबंधारे प्रकल्पातून २४ ते २५ जानेवारी दरम्यान रब्बी पिकासाठी आवर्तन सोडले होते. मात्र देवळीवणी व बोरदैवत येथील ग्रामस्थांनी बळजबरीने पाणी बंद केल्याने या प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेवटच्या अंबिका ओझर या गावाला पाणी पोचले नाही. त्यामुळे येथील आदिवासी शेतकरी हक्काच्या पाण्यापासून वंचित राहिले. आधीच शेतमालाला योग्य दर न मिळाल्याने शेतकरी हताश झाला आहे, रब्बी हंगामासाठी गहू,हरभरा, गावठी कांदा, भाजीपाला या पिकांची लागवड केली असून पिकांना शेवटच्या आवर्तनासाठी पाणी अपुरे पडत असल्यामुळे तत्काळ आवर्तन सोडावे, या मागणीसाठी शेतकºयांनी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते.
माकपा तालुका सरचिटणीस हेमंत पाटील यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन मागणी संदर्भात चर्चा केली आणि महसूल व पाटबंधारे विभागाशी चर्चा घडवून आणली. चर्चा सफल झाल्याने पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अभियंता रौंदळ यांनी ११ फेब्रुवारी रोजी पोलीस बंदोबस्तात पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
यावेळी रामदास खिल्लारी, पोलीस पाटील मन्साराम गांगुर्डे, विक्र म भोये, साहेबराव भोये, एकनाथ भोये, बुधा मांडवी, भाऊसाहेब भोये, परशराम भोये, अविनाश अिहरे, दीपक भोये, बापू भोये, कांशीराम भोये आदींसह शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.