बोंडअळी अनुदानासाठीचे उपोषण मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 12:55 AM2018-10-04T00:55:34+5:302018-10-04T00:56:40+5:30
येवला : तालुक्यातील बोकटेसह २५ गावांतील कपाशीवर आलेल्या बोंडअळीच्या रखडलेल्या अनुदानासाठी ४० शेतकºयांनी सुरू केलेले उपोषण प्रांताधिकाºयांनी दिलेल्या आश्वासनानंतर मागे घेतले.
येवला : तालुक्यातील बोकटेसह २५ गावांतील कपाशीवर आलेल्या बोंडअळीच्या रखडलेल्या अनुदानासाठी ४० शेतकºयांनी सुरू केलेले उपोषण प्रांताधिकाºयांनी दिलेल्या आश्वासनानंतर मागे घेतले.
गुलाबी बोंडअळीने झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून २५ गावांतील अनुदानाचे तातडीने वाटप करावे, यासाठी तहसील कार्यालयासमोर हितेश दाभाडे, किरण दाभाडे, भाऊसाहेब कदम, संभाजी कदम, अशोक दाभाडे, गुलाब दाभाडे, ज्ञानेश्वर दाभाडे, रोशन खांबकर, राजेंद्र दाभाडे, माणिक दाभाडे, बबन घोडेराव, कमलेश दाभाडे, पोपट दाभाडे, विलास दाभाडे, जालिंदर दाभाडे, सोपान साळवे, राहुल लासुरे, सोमनाथ कदम, अरु ण जाधव, बाळासाहेब गायकवाड आदींसह ४० शेतकºयांनी उपोषण सुरू केले होते. या प्रश्नावर शासनाकडे पाठपुरावा करून निधी शेतकºयांच्या खात्यावर वर्ग करण्यासाठीची प्रक्रि या तातडीने सुरू करण्यात येईल, असे आश्वासन प्रांताधिकारी भीमराज दराडे यांनी दिले. या आशयाचे पत्र तहसीलदार रोहिदास वारु ळे यांच्या वतीने नायब तहसीलदार यांनी दिले. या उपोषणास तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी पाठिंबा दिला होता.निधी खात्यावर वर्ग करातालुक्यातील ९७ गावांना आजपर्यंत अनुदानाचे वाटप करण्यात आले. मात्र, तालुक्यातील पूर्वभागातील बोकटे गावासह २५ गावांतील शेतकरी या अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. २५ गावे मिळून ३ कोटी ३७ लाख ५८ हजार ६०१ रु पयांचा निधी अजून शासनाकडून मिळालेला नाही. तो निधी तत्काळ शेतकºयांच्या खात्यावर वर्ग करावा, अशी शेतकºयांची मागणी आहे.