गटसचिवांचे अांदोलन मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 11:47 PM2017-09-10T23:47:58+5:302017-09-11T00:10:23+5:30
मुंबई मंत्रालयात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, सहकारमंत्री सुभाष देशमुख, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, अवर सचिव सहकार रमेश शिंगटे यांची गटसचिव विकास संघटनेच्या पदाधिकाºयांनी भेट घेऊन चर्चा केल्यानंतर असहकार आंदोलन मागे घेण्यात आले.
मालेगाव : मुंबई मंत्रालयात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, सहकारमंत्री सुभाष देशमुख, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, अवर सचिव सहकार रमेश शिंगटे यांची गटसचिव विकास संघटनेच्या पदाधिकाºयांनी भेट घेऊन चर्चा केल्यानंतर असहकार आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी गटसचिवांचे दरमहा चालू वेतन नियमित व वेळेत करण्याच्या अधिकाºयांना सूचना देण्यात आल्या. सहकार आयुक्तांनी १ सप्टेंबर रोजी राज्यभर ७९ (१) च्या निर्देशानुरूप सक्त कार्यवाही करून गटसचिवांचे वेतन अदा केले. वरील बाबींशवाय गटसचिवांना थेट शासकीय सेवेत घेणे, वेतनासाठी शासकीय अनुदान मिळणे, ग्रामसेवकांना समान वेतनमान मिळणे यासाठी शासन स्तरावर लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले. शेतकºयांच्या कर्जमाफीचे कामकाज करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यामुळे गटसचिवांनी आपले असहकार आंदोलन मागे घेत असल्याचे शासनास कळविले आहे. यावेळी अध्यक्ष विश्वनाथ निकम, मुख्य समन्वयक अर्जुन पाटील, सरचिटणीस रविंद्र काळे, किशन गव्हाणे उपस्थित होते.