८८५ ग्रामपंचायतींची रोहयो कामांकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:11 AM2021-06-10T04:11:16+5:302021-06-10T04:11:16+5:30

रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ग्रामपंचायतींना गावातच बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याची संधी प्राप्त करून देण्यात आली असून, त्यात प्रामुख्याने ...

Back to Rohyo works of 885 Gram Panchayats | ८८५ ग्रामपंचायतींची रोहयो कामांकडे पाठ

८८५ ग्रामपंचायतींची रोहयो कामांकडे पाठ

Next

रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ग्रामपंचायतींना गावातच बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याची संधी प्राप्त करून देण्यात आली असून, त्यात प्रामुख्याने रस्ते, वृक्ष लागवड, विहीर बांधणे, गाळ काढणे, शौचालय बांधणे, घरकुरल, ग्रामपंचायत भवन, विहीर पुनर्भरण, दगडी बांध, माती नाला बांध, शेततळे, सिमेंट नाला बंडिंग यासह अनेक व्यक्तिगत व सार्वजनिक स्वरूपाचे कामे आहेत. गावातील कुटुंबाचे रोजगार कार्ड ग्रामपंचायतींकडे तयार असल्याने मागेल त्याला काम देण्याची कायदेशीर तरतूद करण्यात आल्यामुळे कोरोनाच्या काळात शहरी भागातील रोजगार बंद झाल्याने अशा बेरोजगारांना गावातच रोजगार मिळण्याचा मार्ग यामुळे मोकळा झाला आहे.

-----------

तालुकानिहाय सुरू असलेली कामे

बागलाण- २०६

चांदवड- ६१

देवळा- ५३

दिंडोरी- ९५

इगतपुरी- ७३

कळवण- १००

मालेगाव- १७८

नांदगाव- १३८

नाशिक- ६१

निफाड- ६१

पेठ- ०

सिन्नर- ९६

सुरगाणा- १८७

त्र्यंबकेश्वर- ९३

येवला- २३४

--------------

हाताला काम नाही अन् ‘रोहयो’ही नाही

रोजगार हमी योजनेच्या कामात कमी मोबदला मिळतो, त्यामानाने शेती कामात दिवसाला चारशे ते पाचशे रूपये मिळतात. कुटूंबाचा उदर निर्वाहासाठी रोहयोची मजुरी पुरेशी ठरत नाही.

- सखाराम भोये

------------

पावसाळा तोंडावर आल्यामुळे सध्या शेतीच्या मशागतीची कामे सुरू झाली आहेत. त्यामुळे कामांची वानवा नाही, उलट मजूर मिळत नसल्याने रोहयो कामांकडे मजुरांनीच पाठ फिरविली आहे.

- अंबादास देवरे

----------------

शेती कामांमुळे मजुरांची वानवा

शहरी भागात रोजगार मिळणे सुरू झाले आहे. त्यातच पावसाळा तोंडावर असल्यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांनी शेतीच्या मशागतीला प्राधान्य दिल्यामुळे ग्रामपंचायतींच्या रोहयो कामांची मागणी कमी झाली आहेत.

रवींद्र परदेशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत

Web Title: Back to Rohyo works of 885 Gram Panchayats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.