बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मालेगावला पोलीस यंत्रणा सतर्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 06:23 PM2018-08-21T18:23:01+5:302018-08-21T18:23:30+5:30
बकरी ईद सणासाठी पोलीस यंत्रणा सतर्क आहे. कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. शहरातील प्रमुख ११ ठिंकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. पोलीस कवायत मैदानावर बॉम्बशोधक पथकाकडून दररोज तपासणी केली जात आहे. शहराबाहेर १३ ठिकाणी नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी केली जात आहे. ५० जणांना प्रतिबंधात्मक नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.
मालेगाव : बकरी ईद सणासाठी पोलीस यंत्रणा सतर्क आहे. कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. शहरातील प्रमुख ११ ठिंकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. पोलीस कवायत मैदानावर बॉम्बशोधक पथकाकडून दररोज तपासणी केली जात आहे. शहराबाहेर १३ ठिकाणी नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी केली जात आहे. ५० जणांना प्रतिबंधात्मक नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. पोलीस नियंत्रण कक्ष आवारात बकरी ईद सण काळात विशेष कक्ष उभारला जाणार असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी दिली.
पोलीसांची सामान्य नागरिकांसोबत वर्तणुक चांगली असेल तर कायदा हातात घेणाºयांवर कठोर कारवाई केली जाईल हेच माझ्या कामाचे सूत्र आहे. निर्भिड व निपक्ष कारवाईला प्राथमिकता दिली जाईल. बकरी ईद सण काळात कायदा हातात घेणाºयांवर कठोर कारवाई केली जाईल. बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर महसुल, मनपा, वीज वितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग आदि विभागांची बैठक घेऊन तयारीचा आढावा घेण्यात आला आहे. सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात अकरा ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे.गेल्या चार दिवसांपासून पोलीस कवायत मैदानाची बॉम्बशोधक पथकाकडून तपासणी केली जात आहे. पोलीस नियंत्रण कक्ष आवारात विशेष कक्ष सुरू केला जाणार आहे. या कक्षात महसुल, पोलीस, पशुसंर्वधन विभाग, अग्निशमन व इतर विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
नागरिकांनी कुर्बानीसाठी एक कायमस्वरुपी व चौदा तात्पुरत्या कत्तलखान्यांचा वापर करावा. उघड्यावर कुर्बानी देणाºयांवर कारवाईक केली जाईल. बकरी ईद सणकाळात २१ ठिकाणी नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी केली जाणार आहे. गेल्या पाच वर्षात गुन्हे दाखल असलेल्यांना प्रतिबंधात्मक नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. गोरक्षकांनी कायदा हातात घेऊ नये, अवैध धंद्यांविरोधात कडक कारवाई करण्याचे संकेतही निलोत्पल यांनी दिले.