रेल्वे कारखाना रस्त्याची दुरावस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2020 03:52 PM2020-10-11T15:52:27+5:302020-10-11T15:52:55+5:30
मनमाड: येथील रेल्वे कारखाना गेट ते सिनियर इन्स्टीट्यूट पर्यतच्या रस्त्याची दुरावस्था झाली असून रेल्वे कारखान्यात कामावर जाणाºया कामगारांना कसरत करावी लागत आहे. या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी आॅल इंडीया एससी एसटी रेल्वे एम्लॉइज असोशिएशनच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
मनमाड रेल्वे कारखान्याकडे जाणाऱ्या रस्त्याची झालेली दुरावस्था.
मनमाड: येथील रेल्वे कारखाना गेट ते सिनियर इन्स्टीट्यूट पर्यतच्या रस्त्याची दुरावस्था झाली असून रेल्वे कारखान्यात कामावर जाणाºया कामगारांना कसरत करावी लागत आहे. या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी आॅल इंडीया एससी एसटी रेल्वे एम्लॉइज असोशिएशनच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे हा रस्ता पुर्ण खराब झाला आहे. रस्त्यात मोठं मोठे खड्डे पडले आहे.त्यामुळे अपघात होण्याचे शक्यता नाकारता येत नाही.हा खराब रस्ता तात्काळ दुरूस्त करून द्यावा या संदर्भात आॅल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन च्या शिष्टमंडळाने सहाय्यक मंडळ अभियंता यांची भेट घेऊन चर्चा करून त्यांना निवेदन दिले. या रस्त्याचे काम लवकर केले जाईल असे अश्वासन रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आले.
यावेळी संघटनेचे झोनल सचिव सतिश केदारे ,प्रविण आहीरे कार्याध्यक्ष सिद्धार्थ जोगदंड , विजय गेडाम , रमेश पगारे ,सागर गरूड , सुभाष जगताप , सुनिल सोनवणे, अर्जुन बागुल, आदी उपस्थित होते.