इगतपुरी तालुक्यातील रस्त्यांची दुरावस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 04:04 PM2020-08-29T16:04:02+5:302020-08-29T16:04:44+5:30
वाडीव-हे : पावसामुळे इगतपुरी तालुक्यातील रस्त्यांची अक्षरशा चाळण झाली असून वाहनचालकांची वाहन चालवतांना त्रेधा तिरपीठ उड़ते आहे.अनेक वेळा अपघात देखील झाले आहेत.सार्वजनिक बांधकाम विभागाने आणि लोकप्रतिनिधि यांनी लक्ष देऊन रस्ते तातडीने दुरूस्त करण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

इगतपुरी हा तालुका पावसाचे माहेरघर म्हणून परिचित आहे.या अतिपावसामुळे येथील रस्ते देखील वारंवार खराब होत असतात.दरवर्षी तालुक्यातील विविध रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडलेले असतात, घोटी सिन्नर महामार्ग, घोटी - वैतरणा, वाडिव-हे- आहुर्ली-सांजेगाव,नांदुरवैद्य-मुंढेगाव या मुख्य रस्त्यांची दरवर्षी दयनीय अवस्था होत असते. त्याचप्रमाणे यावर्र्षी देखील या रस्त्यांची अवस्था बिकट असुन या रस्त्यांवर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. वाहनचालक,कामगार शेतकरी यामुळे हैराण झाले आहेत.कुंभमेळ्यामध्ये या रस्त्यांचे काम करण्यात आले होते. तेंव्हा पासून ते आजपर्यंत या रसत्यांची अक्षरशा चाळण झाली असून सार्वजनिक बांधकाम विभाग आणि लोकप्रतिनिधि यांनी या रस्त्यांच्या दुरवस्थेकड़े लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे. या रस्त्यांवर पडलेल्या खड्यांवर तात्पुरता मुलामा सार्वजनिक बांधकाम विभागाकडुन करण्यात येतो मात्र पावसाळ्यामध्ये या रस्त्यांची अवस्था जैसे थेच असते. गेल्या अनेक वर्षांपासुन या रस्त्यांवर ठिक ठिकाणी सोडलेले रस्ते अनेक वर्षांपासुन नविन बनवण्यासाठी प्रलंबित आहे. (२९ वाडिवºहे १)