जळगाव नेऊर परिसरातील रस्त्यांच्या दुरावस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 06:50 PM2020-07-28T18:50:15+5:302020-07-28T18:50:43+5:30
जळगाव नेऊर : परिसरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाल्याने पादचारी, वाहनधारक, शेतकरी वैतागले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव नेऊर : परिसरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाल्याने पादचारी, वाहनधारक, शेतकरी वैतागले आहेत.
जऊळके ते मुखेड फाटा, जळगाव नेऊर ते जऊळके, जळगाव नेऊर ते पिंपळगाव लेप या रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली आहे. या रस्त्यावरून मार्ग काढतांना मोठी कसरत करावी लागत आहे. सध्या शेतकरी कांदा विक्र ीसाठी काढत असतांना मालवाहतूकीसाठी पिक अप, रिक्षा वाहनधारक केवळ रस्ता चांगला नसल्याने येत नाही. परिणामी शेतकर्?यांची मोठी अडचण होत आहे. त्यात पावसाळा सुरू झाल्याने परिसरातील शेतकरी, वाहन धारकांची कसोटीच सुरू आहे. सदर रस्त्यांची दुरु स्ती करण्याची मागणी वेळोवेळी केल्या गेली मात्र, प्रशासन दखल घेत नसल्याने, या रस्त्यांना कोणी वाली आहे की नाही असा संतप्त सवाल शेतकरी, वाहनधारक यांचेकडून केला जात आहे.
या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वर्दळ असल्याने वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागत असते. टायर पंचर होणे, फुटणे याबरोबरच अपघात होत असल्याने प्रवाशांना मार्ग बदलावा लागत आहे. तर पिंपळगाव लेप-जळगाव नेऊर या रस्त्याची स्थानिक नागरिकांनी लोकवर्गणी काढून मुरु म टाकुन डागडुजी केली आहे.