भगूर अंगणवाडीच्या बालकांना निकृष्ट आहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 12:52 AM2018-08-27T00:52:17+5:302018-08-27T00:53:20+5:30
येथील राजवाड्यातील अंगणवाडी क्रमांक ६० मधील बालकांना निकृष्ट दर्जाचा पोषण आहार पुरविला जात असून, शासनाने अंगणवाडी बालकांसाठी ठरवून दिलेल्या पूरक पोषण आहाराचे उल्लंघन केले जात असल्याची तक्रार बालकांच्या पालकांनी बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
भगूर : येथील राजवाड्यातील अंगणवाडी क्रमांक ६० मधील बालकांना निकृष्ट दर्जाचा पोषण आहार पुरविला जात असून, शासनाने अंगणवाडी बालकांसाठी ठरवून दिलेल्या पूरक पोषण आहाराचे उल्लंघन केले जात असल्याची तक्रार बालकांच्या पालकांनी बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या अंगणवाडीत येणाºया बालकांसाठी नास्ता व गरम सकस पौष्टिक आहार देण्याचे काम रुक्मिणी महिला बचत गटास देण्यात आलेले असून, या बचत गटामार्फत बालकांना दररोज रेशनच्या तांदळाचा एक किलो अर्धवट शिजलेला चिकट भात पोषण आहार म्हणून दिला जातो. तरी अंगणवाडी बालकांसाठी शासन नियमानुसार पोषण आहार पुरविला जावा, अशी मागणी अनंत झनकर, राहुल साळवे, नितीन साळवे, विशाल साळवे, सचिन सोनकांबळे, सागर भवार यांनी केली आहे. मुळात शासनाने बालकांना कोणता आहार द्यावा याबाबतचे प्रमाण ठरवून दिलेले आहे, परंतु अंगणवाडीत यासंदर्भातील कोणता आहार किती प्रमाणात द्यावा याची कोणतीही माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. त्यामुळे गेल्या आठ वर्षांपासून या अंगणवाडीस बचत गटाकडून दिला जाणाºया पोषण आहारात कधी झुरळ, मुंग्या, किडे सापडतात त्यामुळे बालकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.