येवला तालुक्यात खरिपाचे बिघडले गणित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 12:09 AM2021-07-08T00:09:10+5:302021-07-08T00:10:35+5:30

जळगाव नेऊर : येवला तालुक्यात कृषी विभागाच्या माहितीनुसार ५१ हजार ७४३ हेक्‍टरवर खरिपाची पेरणी झालेली आहे पण या वर्षी मात्र दरवर्षीप्रमाणे शेतकऱ्यांचे खरीप पिकाचे गणित बिघडले असून तालुक्यातील उत्तर-पूर्व भागात खरिप पिकाची कोळपणी, औषधे फवारणी सुरू आहे तर पश्चिम भागात मात्र कुठे पेरणी झाली आहे तर कुठे पेरणीसाठी पावसाची प्रतीक्षा आहे त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांचे वरुणराजाने गणित बिघडले आहे.

Bad maths of kharif in Yeola taluka | येवला तालुक्यात खरिपाचे बिघडले गणित

येवला तालुक्यातील उत्तर पूर्व भागात मका पिकात सुरु असलेली कोळपणी.

Next
ठळक मुद्देकोळपणी, फवारणी, बिजे अंकुरली तर कुठे पेरणी खोळंबली

जळगाव नेऊर : येवला तालुक्यात कृषी विभागाच्या माहितीनुसार ५१ हजार ७४३ हेक्‍टरवर खरिपाची पेरणी झालेली आहे पण या वर्षी मात्र दरवर्षीप्रमाणे शेतकऱ्यांचे खरीप पिकाचे गणित बिघडले असून तालुक्यातील उत्तर-पूर्व भागात खरिप पिकाची कोळपणी, औषधे फवारणी सुरू आहे तर पश्चिम भागात मात्र कुठे पेरणी झाली आहे तर कुठे पेरणीसाठी पावसाची प्रतीक्षा आहे त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांचे वरुणराजाने गणित बिघडले आहे.

पावसावर अवलंबून असलेल्या उत्तर-पूर्व भागात सुरुवातीला झालेल्या पावसावर शेतकर्‍यांनी पेरणी केली पण पंधरा ते वीस दिवस पाऊस उघडल्याने या भागातही कुठे बियाणे उतरले, तर कुठे उतरलेच नाही. पण गेल्या दहा दिवसापूर्वी झालेल्या पावसावर पिकांना जीवदान मिळाले तर कुठे दुबार पेरणी केली, त्यामुळे शेतकऱ्यांची गाडी रुळावर आली असली तरी पश्चिम भागातील साताळी, चिचोंडी बुद्रुक, चिचोंडी खुर्द, भिंगारे, मुखेड परिसर, नेऊरगाव परिसरात अजूनही शेतकरी पेरणीसाठी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
जसजसे दिवस वाढत चालले आहेत तस तसे शेतकरी पिकांमध्ये बदल करत असून पुढील कांदा पिक शेतकऱ्यांना महत्त्वाचे असल्याने अनेक शेतकरी मका ऐवजी सोयाबीन पिकाकडे वळले आहे, कारण मका पिकाला कालावधी जास्त लागत असल्याने व पेरणी लेट होत असल्यामुळे पुढे उन्हाळ कांदा लागवडीसाठी शेतकरी सोयाबीन पिकाकडे कल दिसत आहे.

पिक कामे खोळंबली
कृषी विभागाने एक फुट ओल झाल्याशिवाय पेरणी करू नये असे आवाहन करूनही अनेक शेतकऱ्यांनी थोड्याफार झालेल्या पावसावर पेरणी केली. पण काही दिवसांपासुन पाऊस लांबल्याने अनेक ठिकाणी जमिनीतील ओल संपुष्टात आल्याने पिक कामे खोळंबली आहेत.

गावागावातील पिकांमध्ये फरक

पाऊसही लपंडाव खेळत असल्याने एका गावात बरसतो तर दुसऱ्या गावात वाट बघायला लावतो, अशी परिस्थिती पावसाची झाली असून पिकांमध्ये ही फरक पडला असून एका गावात पिके कोळपणीला आली, तर दुसऱ्या गावात बिजे अंकरली, त्यामुळे मोठ्या प्रमाणात पावसाने धरसोड केल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

मुखेड गटात पावसाची प्रतीक्षा

येवला पश्चिम भागातील चिचोंडी बुद्रुक, चिचोंडी खुर्द, साताळी, भिंगारे, मुखेड, नेऊरगाव परिसरात अजूनही पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने पेरण्या खोळंबल्या असून शेतकरी जोरदार पावसाची प्रतीक्षा करत आहे.
हवामान अंदाज

विश्रांती घेतलेल्या वरुण राजाचे राज्यात ठिकठिकाणी ६ जुलै पासून पावसाला सुरवात होईल व ७ ते ११ तारखेदरम्यान राज्यात सर्व भागात हजेरी लावेल. १२ ते १७ काही भागात मुसळधार तर काही ठिकाणी वाहूनी तर कुठे अतिवृष्टी तर कुठे ढगफुटी तर कुठे रिमझिम पाउस १८ तारखे पर्यंत दररोज भाग बदलत पडणार आहे. या पावसावर सर्व शेतकऱ्यांची राहीलेली पेरणी होइल. दर वर्षी जुलै महिन्यात पाउस कमी असतो पण यावर्षी जास्त पाउस होईल.
-पंजाब डख, हवामान अभ्यासक.



 

Web Title: Bad maths of kharif in Yeola taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.