८५० विद्यार्थ्यांमध्ये रंगणार बॅडमिंटन स्पर्धा

By admin | Published: June 24, 2014 08:27 PM2014-06-24T20:27:23+5:302014-06-25T00:16:34+5:30

८५० विद्यार्थ्यांमध्ये रंगणार बॅडमिंटन स्पर्धा

Badminton tournament will be played in 850 students | ८५० विद्यार्थ्यांमध्ये रंगणार बॅडमिंटन स्पर्धा

८५० विद्यार्थ्यांमध्ये रंगणार बॅडमिंटन स्पर्धा

Next

 ८५० विद्यार्थ्यांमध्ये रंगणार बॅडमिंटन स्पर्धा जिल्ह्यात बॅडमिंटन खेळाला कसा प्रतिसाद आहे?
गेल्या दोन वर्षांपासून बॅडमिंटन खेळाला चांगला प्रतिसाद लाभत आहे. गेल्या चार वर्षांपूर्वी बॅडमिंटन सुविधादेखील कमी होत्या. सरावासाठी कोट कमी होते; मात्र शहरात विविध ठिकाणी सध्या एकूण वीस वुडन कोटमध्ये खेळाडू सराव करतात. नाशिकमध्ये १५० विद्यार्थी खेळाडू प्रशिक्षण घेत असून, दहा वर्ष वयोगटापासून तर थेट प्रौढ वयापर्यंतच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. क्रिकेट खेळानंतर बॅडमिंटन हा खेळप्रकाराचा क्रमांक लागतो. शहराबरोबरच जिल्ह्यात व विभागातदेखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. तालुकास्तरावर आयोजित केल्या जाणाऱ्या विविध स्पर्धांना संघटनेकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाते.
  बॅडमिंटन खेळाच्या प्रगतीसाठी कोणते उपक्रम राबविले जातात?
दरवर्षी संघटनेच्या वतीने दोन जिल्हास्तरीय स्पर्धा घेतल्या जातात. यामधून चांगल्या प्रकारच्या युवा खेळाडूंसह शालेय विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना राज्यस्तरावरदेखील विविध स्पर्धांमध्ये खेळण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते. वर्षभरातून दोन प्रशिक्षण कॅम्पचे आयोजन केले जाते. यामध्ये तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून खेळाडूंना मार्गदर्शन करतात. राज्यस्तरावर पाठविल्या जाणाऱ्या खेळाडूंचा खर्च संघटनेकडून केला जातो. यंदा नाशिकची १५ वर्ष वयोगटातून वैदेही चौधरी ही खेळाडू राज्यस्तरावर निवडली गेली असून, ती इंडोनेशिया येथे विशेष प्रशिक्षण घेण्यासाठी गेली आहे.
 यावर्षी होणाऱ्या स्पर्धेचे वैशिष्ट्य कोणते?
गेल्या पाच वर्षांमध्ये तिसरी राज्यस्तरीय स्पर्धा शहरात आयोजित केली जात आहे. दिवसेंदिवस आर्थिकदृष्ट्या संघटना बळकट होत आहे. आज (दि. २५) मीनाताई ठाकरे स्टेडियम आडगाव नाका येथे पाच दिवसीय स्पर्धा खेळविली जाणार आहे. या स्पर्धेसाठी राज्यातून ८५० प्रवेशिका आल्या आहेत हेच या स्पर्धेचे मुख्य वैशिष्ट्य आहे. तिन्ही गटांमध्ये सेमी फायनल, क्वार्टर फायनल, फायनलमध्ये विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम व स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
  स्पर्धेमध्ये कोणत्या नामांकित खेळाडूंनी सहभाग आहे?
संघटनेच्या वतीने महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन विविध वयोगटामध्ये स्पर्धा आयोजित करते. यामध्ये सब ज्युनिअर, ज्युनिअर अ‍ॅन्ड सिनियर या तीन गटांत स्पर्धा खेळविली जाते. नाशिकमध्ये आजपासून सुरू होणाऱ्या पाच दिवसीय बॅडमिंटन स्पर्धेमध्ये मुंबईची सिमरन संधी, पूर्वा बर्वे, वरुण दवे, रोहन गुरनानी, तनिष्का देशपांडे, अमन फारूख आदिंचा समावेश आहे. नाशिक जिल्ह्याचे एकूण दोनशे विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रदीप गंधे यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे.

Web Title: Badminton tournament will be played in 850 students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.