बागलाण : १९ ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 01:05 PM2019-11-13T13:05:20+5:302019-11-13T13:05:39+5:30

जोरण : बागलाण तालुक्यातील महत्वाच्या १९ ग्रामपंचायतींच्या थेट सरपंच पदाच्या निवडणुकीचा कार्यक्र म जाहीर झाला आहे. येत्या शनिवारी १६ ते २१ नोव्हेंबर दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करणे व तसेच २५ नोव्हेंबरला माघारी व ६ डिसेंबरला मतदान ९ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील यांनी दिली.

Baglan: Announcement program for direct sarpanch of 19 Gram Panchayats | बागलाण : १९ ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर

बागलाण : १९ ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर

Next

जोरण : बागलाण तालुक्यातील महत्वाच्या १९ ग्रामपंचायतींच्या थेट सरपंच पदाच्या निवडणुकीचा कार्यक्र म जाहीर झाला आहे. येत्या शनिवारी १६ ते २१ नोव्हेंबर दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करणे व तसेच २५ नोव्हेंबरला माघारी व ६ डिसेंबरला मतदान ९ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील यांनी दिली.  विधानसभेनंतर होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणूकांमुळे तालुक्यातील वातावरण चांगलेच तापणार आह. ग्रामिण भागातील कार्यकर्त्यांच्या ठिकठिकाणी चर्चेसाठी बैठका घेतल्या जात आहे . मिनी मंत्रालयाच्या सत्तेसाठी तालुक्यातील काही ठिकाणी तरु ण वर्ग हा रिंगनात उतरणार असल्याचे चित्र आहे.
बागलाण तालुक्यातील थेट सरपंचपदासाठी १९ ग्रामपंचायती : जोरण, साल्हेर, पठावे दिगर, जुने निरपुर, बिजोरसे, फोपीर, अजमिर सौंदाणे, किकवारी खुर्द, देवपुर (चाफापाडा), ब्राम्हणपाडे, नवे निरपुर, कर्Þहे, सुराणे, नवेगाव, काकडगाव, पारनेर, नांदीन, भडाणे, आखतवाडे या ग्रामपंचायतीचा सरपंचाचा कार्यकाळ संपला असुन थेट सरपंच पदाच्या निवडणूका होणार आहेत. नांदीन, नवे निरपुर, काकडगाव,नवेगांव , बिजोरसे, पारनेर, भडाणे, ग्रामपंचायतीचे सरपंचपद सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी आहे तर किकवारी खुर्द,देवपुर (चाफापाडा), फोपीर, जुने निरपुर, ग्रामपंचायतीचे सरपंचपद अनुसुचित जमाती, तर साल्हेर, कºहे, जोरण, सुराणे, पठावे दिगर ग्रामपंचायतीचे सरपंचपद अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी राखीव आहे.

Web Title: Baglan: Announcement program for direct sarpanch of 19 Gram Panchayats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक