बागलाण तालुक्यात कडधान्यासह तेलबिया पेरणी क्षेत्रात दुपटीने वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 10:34 PM2020-06-23T22:34:53+5:302020-06-23T22:35:37+5:30
सटाणा : बागलाण तालुक्यात यंदा मान्सूनपूर्व त्यापाठोपाठ मान्सूनचे वेळेवर आणि दमदार आगमन झाल्यामुळे खरीप हंगाम जोमात आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत खरिपाच्या सरासरी पेरणी क्षेत्रात दुपटीने वाढ झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सटाणा : बागलाण तालुक्यात यंदा मान्सूनपूर्व त्यापाठोपाठ मान्सूनचे वेळेवर आणि दमदार आगमन झाल्यामुळे खरीप हंगाम जोमात आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत खरिपाच्या सरासरी पेरणी क्षेत्रात दुपटीने वाढ झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. यंदा तब्बल ६७ हजार ८३०.६० हेक्टर इतके सरासरी पेरणी क्षेत्र असून त्यांच्यात कडधान्य आणि तेलबिया पेराक्षेत्रात सरासरी तीन ते चार पटीने वाढ झाली आहे. त्यामुळे यंदा तेलबिया आणि कडधान्याच्या उत्पादनात वाढ होणार आहे.
बागलाण तालुक्यात सलग कमी पावसामुळे दुष्काळी स्थिती होती. त्यामुळे गेल्या वर्षी खरिपाच्या पेराक्षेत्रात घट होऊन ३६ हजार ८४८ इतके सरासरी पेराक्षेत्र होते. पाऊस लांबल्याने आणि लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे पीक हातातून गेले. यंदा मात्र चक्रीवादळामुळे आलेला पाऊस व त्यानंतर मान्सूनचे झालेले दमदार आगमन यामुळे खरीप हंगाम जोमात आहे.रासायनिक खतांचा तुटवडा...तालुक्यात रासायनिक खतांचा तुटवडा असल्याची शेतकऱ्यांची ओरड आहे. त्यास कृषी विभागानेदेखील दुजोरा दिला आहे. युरियाचा मोठ्या प्रमाणात तुटवडा असून, तत्काळ पुरवठा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. तर दुसरीकडे १५:१५:१५ ही रासायनिक खतेदेखील कमी प्रमाणात उपलब्ध आहे. वेळेवर खते उपलब्ध होत नसल्यामुळे उत्पादनावर याचा परिणाम होण्याची भीती शेतकºयांकडून व्यक्त केली जात आहे. कडधान्य उत्पादन वाढणारतालुक्यात यंदा कडधान्य पेराच्या सरासरी क्षेत्रात मोठी वाढ झाल्याचे बघायला मिळत आहे. गेल्यावर्षी ९0९ हेक्टर इतकेच पेराक्षेत्र होते. यंदा त्यात मोठी वाढ होऊन ५ हजार ७१९ हेक्टर इतके सरासरी पेराक्षेत्र असून सर्वाधिक मूग पेºयाकडे शेतकºयांचा कल दिसून येत आहे. मूगापाठोपाठ तूर, उडीद, कुळीथ या पिकांकडे शेतकºयांचा कल दिसून येत आहे. १६ जूनअखेर सरासरी पेराक्षेत्रापैकी ८५४.६0 हेक्टरवर कडधान्याचा पेरा झाला आहे.तृणधान्याचा पेरा ५२%तालुक्यात जूनच्या सुरुवातीला दमदार पाऊस झाल्यामुळे मका आणि बाजरी पिकाच्या पेरण्यांनी वेग घेतला आहे. नामपूर, जायखेडा, ताहाराबाद, अंतापूर, वीरगाव करंजाड, निताणे, मुंजवाड, डांगसौंदाणे, किकवारी, आराई, ब्राह्मणगाव, लखमापूर आदी परिसरात मक्याच्या सरासरी ३४ हजार ८५९ हेक्टर पेराक्षेत्रापैकी २२ हजार १९५.७0 हेक्टर क्षेत्रावर पेरा झाला आहे, तर बाजरीच्या १९ हजार ८५१ हेक्टर सरासरी पेराक्षेत्रापैकी ८ हजार ७४.८0 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. ज्वारी मात्र दुर्मीळच असून, फक्त १३ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.तेलबियांकडे शेतकºयांचा कलबागलाण ८0 आणि ९0 च्या दशकात तेलबिया उत्पादनातदेखील अव्वल होता. मात्र वारंवार घेतले जात असलेले उत्पादन यामुळे खर्चाच्या तुलनेत उत्पादन घटल्याने शेतकºयांनी या पिकांकडे पाठ फिरवली होती. गेल्या वर्षी फक्त ९0३ हेक्टर एवढेच सरासरी तेलबिया पेराक्षेत्र होते. यंदा त्यात मोठी वाढ होऊन ३६0४ हेक्टर सरासरी पेराक्षेत्र असून, भुईमूग आणि सोयाबीन या पिकांकडे कल दिसून येत आहे. त्यामुळे १६ जूनअखेरपर्यंत १४३४.९0 हेक्टर क्षेत्रावर पेरा करण्यात आला आहे. मोसम, आराम, हत्ती, कान्हेरी आणि करंजाडी या नद्यांमुळे संपूर्ण परिसर सुपीक आहे. त्यामुळे मोसम, आरम, करंजाडी खोºयात तृणधान्य, तेलबिया आणि कडधान्य पेराक्षेत्रात मोठी वाढ झाल्याचे बघायला मिळत आहे. बागलाण तालुक्यातील पश्चिम आदिवासी पट्टा हे भाताचे आगार मानले जाते. मात्र पावसाच्या लहरीपणामुळे दिवसेंदिवस भाताच्या क्षेत्रात घट होत चालली आहे. गेल्या वर्षी भात लावडीचे सरासरी क्षेत्र १३७७ हेक्टर होते. यंदा त्याच्या वाढ होऊन २0३१.६0 हेक्टर सरासरी भात लागवडीचे क्षेत्र आहे.