कळवण तालुका मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी बागुल, उपाध्यक्षपदी पगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 06:33 PM2020-08-13T18:33:30+5:302020-08-13T18:37:31+5:30
कळवण : शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा चणकापुर येथे जिल्हा मुख्याध्यापक संघ पदाधिकारी यांच्या उपस्थितीत कळवण तालुका मुख्याध्यापक संघ कार्यकारिणी जाहीर करण्यात येऊन तालुकाध्यक्षपदी बेज विद्यालयाचे मुख्याध्यापक पी. एम. बागुल यांची, उपाध्यक्ष म्हणून एम. बी. जोशी व आर. टी. निकम यांची, कार्याध्यक्षपदी चणकापूर आश्रमशाळेचे मुख्याध्यापक आर. डी. पाटील यांची तर कार्यवाहपदी सप्तश्रृंगी गड विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. डी. ठोके यांची निवड करण्यात आली.

कळवण तालुक्यातून जिल्हा मुख्याध्यापक संघावर उपाध्यक्ष म्हणून आर. के. एम. विद्यालयाचे मुख्याध्यापक एल. डी. पगार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
कार्यकारिणीत रु पवते (सह कार्याध्यक्ष), एच. आर. खैरनार (कोषाध्यक्ष) वाय. आर. गुंजाळ (सह कोषाध्यक्ष), एन. जी. बधान, एस. के. आहेर (तालुका समन्वयक), श्रीमती के. डी. आहेर, श्रीमती पी. पी. सागर (महिला प्रतिनिधी), के. जे. शिरोडे, एस. जी. गायकवाड, ए .जी. देवरे, डी. एन. आहिरे, एस. डी. भामरे (मार्गदर्शक), बी. ए. निकम (लेखापाल), एम. जी. कोतकर , के. एच. शेवाळे (प्रवक्ता) आदींची निवड करण्यात आली.
यावेळी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष गुलाब भामरे, आर. डी. निकम, साहेबराव कुटे, बी. एन. देवरे, के. के. अहिरे, के. एल. चव्हाण, ए. डी. मोरे, एन. डी. भामरे, सी. बी. पवार, व्ही. के. मोहिते आदी उपस्थित होते. (फोटो १३ बागुल, पगार)