कळवण तालुक्यात बहरली केळीची शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:12 AM2021-06-04T04:12:00+5:302021-06-04T04:12:00+5:30

कळवण : पारंपरिक शेतीला फाटा देत शेतीत नवनवीन प्रयोग केले तर नाविन्यतेसह इतर शेतकऱ्यांनाही प्रेरणा मिळू शकते, हे उदाहरण ...

Bahrali banana cultivation in Kalvan taluka | कळवण तालुक्यात बहरली केळीची शेती

कळवण तालुक्यात बहरली केळीची शेती

googlenewsNext

कळवण : पारंपरिक शेतीला फाटा देत शेतीत नवनवीन प्रयोग केले तर नाविन्यतेसह इतर शेतकऱ्यांनाही प्रेरणा मिळू शकते, हे उदाहरण कळवण तालुक्यातील मानूर येथे बघायला मिळत आहे. येथील डॉ. समीर पवार यांनी केळी उत्पादनाचा प्रयोग यशस्वी करत शेती क्षेत्रातील तरुण शेतकऱ्यांपुढे प्रेरणा निर्माण केली आहे. नामांकित स्त्रीरोगतज्ज्ञ स्वर्गीय डॉ. अमृतराव तथा आप्पासाहेब कृष्णाजी पवार यांचे सुपुत्र डॉ. समीर पवार यांनी शेती क्षेत्रात आधुनिकतेची कास धरत सूक्ष्म नियोजन, घेत असलेल्या पिकाबद्दल पूर्ण अद्ययावत माहिती आणि कष्ट करायची जिद्द ठेवली तर शेतीत नाविन्यता निर्माण करता येते, ही खूणगाठ मनाशी बांधली. डॉ. पवार यांनी आपल्या भगिनी श्रीलेखा पाटील यांच्या मार्गदर्शनाने मानूर येथील आपल्या शेतात केळी उत्पादन घेण्याचे ठरवले. आठ एकर क्षेत्रात जैन एरिगेशनच्या जी - ९ प्रकारातील रोपांची लागवड करण्यात आली. एक एकर क्षेत्रात जवळपास दहा हजार रोपांची लागवड करण्यात आली असून, एकूण आठ एकर क्षेत्रातून अडीचशे टनच्या आसपास उत्पादन निघेल, अशी माहिती डॉ. पवार यांनी दिली. रोपे, खते, हार्वेस्टर व इतर बाबी धरून एकरी ९६ हजार रुपये खर्च असून, एकरी ४५ ते ५० टन उत्पादन निघणार आहे. सध्या पॅकेजिंग आणि एक्सपोर्टचे काम सुरू आहे. (०३ कळवण १/२)

------------------

शेती क्षेत्रातली वेगळी वाट -

डॉ. समीर पवार हे नाशिक शहरातील नामांकित डॉक्टर असून, स्वर्गीय डॉ. अप्पासाहेब पवारांचा सामाजिक वारसा आणि बहीण श्रीलेखा पाटील यांच्या मार्गदर्शनाने शेती क्षेत्रातही वेगळे प्रयोग राबवत आधुनिक पद्धतीने शेती करत आहेत. जळगाव जिल्ह्यात केळीचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. जिल्ह्यात अपवादात्मक उदाहरणे आढळतात. मानूर येथील डॉ. पवार यांनी केळी लागवड केलेले हे क्षेत्र जिल्ह्यातील सर्वात मोठे क्षेत्र आहे.

-------------------

शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांसोबतच शेतीत नाविन्यता जोपासून नवनवे प्रयोग राबवायला हवेत. सद्यस्थितीत युवा शेतकरी आता आधुनिक पद्धतीने शेती करत असून, वेगवेगळे प्रयोग राबवत आहेत, ही आशादायक बाब आहे. आम्हीदेखील केळी उत्पादनाचा हा प्रयोग पहिल्यांदाच करत असून, तो यशस्वी झाला आहे.

- डॉ. समीर पवार, मानूर

===Photopath===

030621\03nsk_26_03062021_13.jpg

===Caption===

०३ कळवण १/२

Web Title: Bahrali banana cultivation in Kalvan taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.