बहुजनांचा क्रांती मोर्चा

By admin | Published: January 3, 2017 11:45 PM2017-01-03T23:45:23+5:302017-01-03T23:45:44+5:30

लक्षवेधी घोषणा : आरक्षणासह अ‍ॅट्रॉसिटीच्या संरक्षणाची मागणी

Bahujan's Revolution Front | बहुजनांचा क्रांती मोर्चा

बहुजनांचा क्रांती मोर्चा

Next

नाशिक : अ‍ॅट्रॉसिटीचा कायदा अधिक कडक करावा, जातीनिहाय ओबीसींची गणना व्हावी, बलात्काऱ्यांना कठोर शिक्षा द्यावी तसेच मराठा, मुस्लीम, ख्रिश्चन समाजाला आरक्षण द्या, मुस्लिमांच्या बाबतीत सच्चर आयोगाचा अहवाल मान्य करावा, समान नागरी कायदा लागू करू नये, आदि मागण्यांसाठी बहुजन क्रांती मोर्चा शहरातून काढण्यात आला.  विविध जाती-धर्माच्या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत विविध मागण्यांसाठी मंगळवारी (दि. ३) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोेर्चा काढण्यात आला. मोर्चाच्या प्रारंभी बी. डी. भालेकर मैदानावर उभारण्यात आलेल्या व्यासपीठावरून विविध मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी आरक्षणाबाबत सरकारची जाती-धर्मनिहाय भूमिका, अ‍ॅट्रॉसिटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणीबाबत उपस्थिताना भाषणातून मार्गदर्शन केले. मोर्चाला दुपारी अडीच वाजेच्या सुमारास सुरुवात करण्यात आली. मोर्चा शालिमार, नेहरू उद्यानामार्गे एम.जी. रोडवरून मार्गस्थ होत मेहेर चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचला.   मोर्चेकऱ्यांच्या वतीने अ‍ॅड. सुजाता चौदंते, अ‍ॅड. प्रदीप संसारे, किशोर अंबोरे, नंदिनी जाधव, अजिज पठाण आदिंच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.

Web Title: Bahujan's Revolution Front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.