निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा बैरागी परिषदेचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 03:08 PM2017-11-20T15:08:44+5:302017-11-20T15:12:23+5:30
नाशिक : वैष्णव बैरागी समाजाच्या पाचशे वर्षापुर्वीच्या परंपरा असलेल्या मंदिर जमीनी मुळ कुटुंबांना परत करण्यात याव्यात अन्यथा देशपातळीवर आंदोलन करून सर्व राज्यांच्या निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा ठराव अखिल भारतीय वैष्णव बैरागी परिषदेच्या डाकोर (गुजरात) येथे झालेल्या वार्षिक बैठकीत करण्यात आला. या शिवाय राष्टÑीय व राज्यपातळीवर प्रदेशाध्यक्षांच्या नवीन नियुक्त्याही यावेळी जाहीर करण्यात आल्या.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संस्थापक तथा राष्टÑीय अध्यक्ष आर. के. वैष्णव होते. पाचशे वर्षापुर्वी देवस्थान सांभाळणा-या वैष्णव बैरागी राजे, महाराजे यांनी जमिनी दान केल्या होत्या मात्र कालांतराने काही बलवान घटकांनी जबरदस्तीने जमिनींवर ताबा घेतला काही ठिकाणी राजकीय शक्ती वापरून ट्रस्ट बनविले व आपले नावे लावून घेतली. या संदर्भात उज्जैन, हैद्राबाद, कलकत्ता अन्य उच्च न्यायालयांनी दिलेले निका विचारात घेऊन केंद्र सरकारने देवस्थान जमीनी वैष्णव बैरागी यांना देण्याबाबत कायमस्वरूपी कायदा करावा तसेच मंडल आयोगाच्या निर्णयाप्रमाणे ओबीसी सुचीमध्ये सुधारणा करून प्रत्येक राज्यातील बैरागी जातीचा सुची क्रमांक एकच असावा अशी मागणी करणारा ठराव यावेळी करण्यात आला. सरकारने समाजाच्या भावना विचारात न घेतल्यास देशभरात एकाच वेळी चक्का जाम आंदोलन करण्याचा तसेच निवडणुकीवर बहिष्कार टाकू असा ठराव करण्यात आला. या बैठकीतच राष्टÑीय महिला अध्यक्ष म्हणून श्रीमती मंजुला बेन लष्करी (गुजरात), उपाध्यक्ष सौ. मधुमती वैष्णव (संगमनेर), राष्टÑीय महामंत्री म्हणून डॉ. निर्मला वैद्य यांची निवड करण्यातआलाी तर महाराष्टÑाच्या अध्यक्षपदी अशोक बैरागी (सिन्नर) व मुंबईच्या अध्यक्षपदी अशोक एस. वैष्णव यांची निवड जाहीर करण्यात आली.