बिटको चौक बनला धोकेदायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 01:44 AM2017-07-29T01:44:17+5:302017-07-29T01:44:17+5:30
जेलरोडला शाळेत जाणाºया विद्यार्थी व मुद्रणालयात कामावर जाणाºया कामगारांची सकाळी बिटको चौकात गर्दी होत असून, यावेळेस सिग्नल यंत्रणा सुरू राहत नसल्याने अपघात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सकाळी शाळा व मुद्रणालय भरताना एक तास वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी पालक व कामगारांनी केली आहे.
नाशिकरोड : जेलरोडला शाळेत जाणाºया विद्यार्थी व मुद्रणालयात कामावर जाणाºया कामगारांची सकाळी बिटको चौकात गर्दी होत असून, यावेळेस सिग्नल यंत्रणा सुरू राहत नसल्याने अपघात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सकाळी शाळा व मुद्रणालय भरताना एक तास वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी पालक व कामगारांनी केली आहे. जेलरोड रस्त्यावर र. ज. चौव्हाण, बिटको गर्ल्स हायस्कूल, कोठारी कन्या शाळा, पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल, सेंट फिलोमीना हायस्कूल, के. एन. केला हायस्कूल, व्हिजन अकॅडमी, वनिता विकास शाळा, अभिनव मराठी शाळा, नवीन मराठी शाळा, आरंभ महाविद्यालय आदि शाळा, महाविद्यालय व खासगी क्लासेस आहेत. नाशिकरोडच्या भागांतून या शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी बिटको चौकमार्गे जेलरोडवरून शाळा, महाविद्यालय, खासगी क्लासला जातात, तर जेलरोड येथील चलार्थपत्र मुद्रणालय व भारत प्रतिभूती मुद्रणालयातदेखील याच मार्गे सकाळी कामगार मोठ्या संख्येने कामावर जातात. शाळा, मुद्रणालय भरतांना बिटको चौकातील सिग्नल यंत्रणा सुरू झालेली नसते. बिटको चौक ओलांडून जेलरोडकडे विद्यार्थी, पालक, कामगार जात असताना दत्तमंदिर सिग्नलकडून बिटको चौकाकडे येणारी वाहने ही अंगावर येतात. त्यामुळे दुर्दैवाने मोठा अपघात घडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे बिटको चौकात शाळा-महाविद्यालय व मुद्रणालय भरण्याच्या वेळेला सकाळी ६.३० ते ७.३० या एक तासाकरिता वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी पालक व प्रेस कामगारांनी केली आहे.
दरम्यान, नाशिकरोड, जेलरोड परिसरातील अनेक रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत असल्याने अपघाताची शक्यता आहे.