बाजेरे मुरलीया बाजे..., पदमनारायणा अनंता मधुसूदना...,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 00:58 IST2019-04-09T00:58:16+5:302019-04-09T00:58:34+5:30
भेदाचे ते गाव पळोनी गेले क्र ोध काम... जब जानकी नाथ सहाय करे... अशा एकाहून एक सरस भक्तिगीत व भजनांनी पाडवा पहाट कार्यक्रमात उपस्थित मंत्रमुग्ध झाले होते.

बाजेरे मुरलीया बाजे..., पदमनारायणा अनंता मधुसूदना...,
नाशिकरोड : बाजेरे मुरलीया बाजे..., पदमनारायणा अनंता मधुसूदना..., अवघा रंग एक झाला, पायोजी मैने राम रतन धन पायो..., भेदाचे ते गाव पळोनी गेले क्र ोध काम... जब जानकी नाथ सहाय करे... अशा एकाहून एक सरस भक्तिगीत व भजनांनी पाडवा पहाट कार्यक्रमात उपस्थित मंत्रमुग्ध झाले होते.
ऋतुरंग भवनमध्ये पाडवा पहाट कार्यक्रमाचे उद्घाटन गायक रघुनंदन पणशीकर व ऋतुरंग परिवार सदस्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन, गुढीचे पूजन करून करण्यात आले.
शास्त्रीय गीतानंतर पणशीकर यांनी अहो नारायणा सांभाळावे आम्हा दिन हा अभंग गात भजन व भावगीते सादर केली. तसेच भीमसेन जोशी, किशोरी अमोणकर यांच्या पारंपारिक रचना त्यांनी सादर केल्या. पणशीकर यांना संवादिनीवर सुभाष दसककर, तबल्यावर प्रशांत पांडव, तंबोऱ्यावर वृषाली गाडेकर यांची साथसंगत लाभली. पराग जोशी यांनी ध्वनी व्यवस्था सांभाळली. यावेळी विजय संकलेचा, वसंत नगरकर, प्रकाश पाटील, राजा पत्की, नितीन क्षत्रिय, वसंत घोडके, डॉ. उत्तमकुमार जोशी, दत्तात्रय गाडे आदी उपस्थित होते.
प्रख्यात गायक रघुनंदन पणशीकर यांनी प्रारंभी राग तोडीमधील मेरे मन याहू रटे रे ही बंदीश सादर केली. द्रुतमध्ये गाईये बेगुण गुण गाईये, अल्ला के सामने ही बंदीश सादर केली. त्यानंतर राग अलय्या बिलावलमध्ये कवन बटरिया गैलो ही बंदीश गाऊन श्रोत्यांच्या टाळ्या मिळविल्या.