जिल्ह्यात हमीभावाने बाजरी खरेदीसाठी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 08:32 PM2020-10-17T20:32:27+5:302020-10-18T00:32:02+5:30

लासलगाव : जिल्ह्यात हमीभावाने बाजरी खरेदीसाठी सात केंद्राना शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे. जिल्ह्यातील येवला, सिन्नर, चांदवड, नांदगाव, मालेगाव, देवळा, लासलगाव येथे बाजरी खरेदी केंद्रे सुरू होणार आहे. शासकीय केंद्रामुळे शेतकर्यांना क्विंटल मागे एक हजार रु पयांचा लाभ होणार आहे.

Bajra will be purchased in the district with a guarantee | जिल्ह्यात हमीभावाने बाजरी खरेदीसाठी होणार

जिल्ह्यात हमीभावाने बाजरी खरेदीसाठी होणार

Next
ठळक मुद्देशेतकर्यांना क्विंटल मागे एक हजार रु पयांचा लाभ होणार

लासलगाव : जिल्ह्यात हमीभावाने बाजरी खरेदीसाठी सात केंद्राना शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे. जिल्ह्यातील येवला, सिन्नर, चांदवड, नांदगाव, मालेगाव, देवळा, लासलगाव येथे बाजरी खरेदी केंद्रे सुरू होणार आहे. शासकीय केंद्रामुळे शेतकर्यांना क्विंटल मागे एक हजार रु पयांचा लाभ होणार आहे.
शासकीय भरड धान्य खरेदी योजनेंतर्गत आधारभूत किंमत दोन हजार 150 रु पये दराने शासकीय बाजरी खरेदी केंद्र सुरू करून बाजरी उत्पादक शेतकर्यांचा होणारा तोटा दूर करत न्याय द्यावा, अशी मागणी ज्येष्ठ नेते ?ड. माणकिराव शिंदे यांनी केली होती.
यासंदर्भात पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शासनदरबारी पाठपुरावा करून येवलासह सिन्नर, चांदवड, नांदगाव, मालेगाव, देवळा, लासलगाव येथे बाजरी खरेदी केंद्रे सुरू करण्याचा निर्णय पाठपुरावा करत मंजूर करून घेतला. किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत शासकीय बाजरी खरेदी केंदासाठी येवला तालुका सहकारी खरेदी-विक्र ी संघाची नेमणूक केली आहे.
1 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीत दोन हजार 150 रु पये प्रतिक्विंटल दराने शासकीय बाजरी खरेदी होणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष अनिल सोनवणे, उपाध्यक्ष दगडू टर्ले यांनी दिली. तालुक्यात आठ हजार हेक्टर बाजरीची पेरणी झालेली असून, शुक्र वारी (ता.16) 1,100 ते 1,200 रु पये प्रतिक्विंटल बाजारभावाने बाजरी विक्र ी होत असून, कवडीमोल भावात बाजरीच्या पिकांचा उत्पादनखर्चही निघणार नाही.

बाजरी उत्पादकांनी नोंदणीसाठी संपर्क करा
बाजरीची शासकीय आधारभूत किंमत व सध्याचे बाजारभाव यातील फरक प्रतिक्विंटल 1,100 रु पये नुकसानीस आज शेतकर्यांना सोसावे लागत आहे. मात्र, केंद्र मंजुरीमुळे 20 कोटी रु पयांचा फायदा तालुक्यातील बाजरी उत्पादक शेतकर्यांना होणार आहे. दरम्यान, शासकीय बाजरी आॅनलाइन नोंदणी 1 नोव्हेंबरला सुरू होणार आहे. बाजरी पिकाची सातबारा उतार्यावर आॅनलाइन नोंद, 8 अ उतारा, आधारकार्ड झेरॉक्स, बँक पासबूक झेरॉक्सची पूर्तता बाजरी उत्पादकांनी करून नोंदणीसाठी संपर्क करावा, असे आवाहन संघाचे व्यवस्थापक बाबा जाधव यांनी केली आहे.
सध्याचे बाजारभाव व शासकीय हमीभावात हजार रु पयांची तफावत आहे. त्यामुळे शेतकर्याचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी बाजरी खरेदी सुरू करणे आवश्यक होते. येवल्यात शासकीय बाजरी केंद्रास मान्यता हा शेतकरीहिताचा निर्णय आहे. बाजरी हेक्टरी 30 ते 35 क्विंटल व मका 75 ते 80 क्विंटल मर्यादेप्रमाणे खरेदी व्हावी, ही अपेक्षा.
- ?ड. माणकिराव शिंदे, ज्येष्ठ नेते, येवला.

Web Title: Bajra will be purchased in the district with a guarantee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.