किकवारी च्या सरपंचपदी बाळू सोनवणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 04:03 PM2019-12-17T16:03:07+5:302019-12-17T16:04:05+5:30
जोरण : बागलाण तालुक्यातील आदर्श गाव नावलौकिक असलेल्या किकवारी खुर्द या गावाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत आजही समाजापुढे परंपरा जोपासत एक नवा आदर्श ठेवत बिनविरोध निवडणूक घडवून आणली.
यंदा प्रथमच थेट जनतेतून थेट सरपंच निवडून द्यायचा होता. यावेळी सर्वानुमते सरपंचपदी बाळू रामू सोनवणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. सदस्यपदी दीपक काकुळते, किरण काकुळते, रंजना काकुळते, अंजना काकुळते, नंदू सोनवणे, मेघा शिंदे, विमलबाई सोनवणे, मंजुळाबाई सोनवणे, दत्तू पवार आदींची निवड सर्वानुमते बिनविरोध करण्यात आली होती.
उपसरपंचपदासाठी निवडणूक घेण्यात आली. यावेळी उपसरपंचपदासाठी दीपक काकुळते यांचा एकमेव अर्ज असल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काकुळते यांची उपसरपंचपदी निवड झाली असे जाहीर केले व यावेळी उपस्थित असलेले सरपंच व सदस्य यांच्यासमोर निकाल जाहीर केला. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक नांद्रे यांनी काम पाहिले.
यावेळी दावल काकुळते, सीताराम काकुळते, बाळू काकुळते, रामदास काकुळते, अण्णा अहिरे, विक्र म काकुळते, संजय काकुळते, अण्णा काकुळते, कडू पाटील, जिभाऊ काकुळते, बाजीराव बाविस्कर, सुरेश काकुळते, रमेश काकुळते, पांडुरंग सावकार तसेच विशेष परिश्रम दिनेश काकुळते, नितीन काकुळते, उमेश काकुळते, जावेद शहा, बबलू शहा, बुधा खैरनार, उमाजी नाईक, रायसिंग गांगुर्डे, पिंटू गवळी, दगा शिंदे, समाधान पवार, दिलीप अहिरे, अरु ण धोंडगे, सुनील सोनवणे, पोपट गायकवाड, रमेश चव्हाण, दिलीप अहिरे, शांताराम काकुळते, दाजी काकुळते, काकाजी अनाजी यांनी घेतले.