‘बाल गीतरामायणा’स रसिकांची दाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 12:59 AM2019-05-09T00:59:33+5:302019-05-09T01:02:40+5:30
नाशिक : ‘लोकमत’ व ‘आकार’ पुणे या संस्थेच्या वतीने आयोजित बाल गीतरामायणाचा कार्यक्रम नाशिककरांनी अक्षरश: डोक्यावर घेतला. रसिक आणि कलाकार असे नाते न रहाता कौटुंबिक सोहळ्यागत संपन्न झालेल्या बालगोपालांच्या संगीत मैफिलीस भरभरून दाद दिली.
नाशिक : ‘लोकमत’ व ‘आकार’ पुणे या संस्थेच्या वतीने आयोजित बाल गीतरामायणाचा कार्यक्रम नाशिककरांनी अक्षरश: डोक्यावर घेतला. रसिक आणि कलाकार असे नाते न रहाता कौटुंबिक सोहळ्यागत संपन्न झालेल्या बालगोपालांच्या संगीत मैफिलीस भरभरून दाद दिली.
महाकवी कालिदास कलामंदिर येथे संपन्न झालेल्या या कार्यक्र मास पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.‘बाल गतिरामायण’ या कार्यक्रमात आकार संस्थेचे १० ते १७ वयोगटातील सुमारे ३० मुले सहभागी झाली होती. गायन, वादन आणि निवेदन सारे काही मुलांचेच होते. कार्यक्रमाचे संहितालेखन वंदना बोकील-कुलकर्णी व माधुरी गयावळ यांनी केले होते.
या आगळ्या-वेगळ्या बाल गीतरामायण कार्यक्रमात स्वये श्री राम प्रभु ऐकती, शरयू तीरा वरी अयोध्या, दशरथा घे हे पाय सदान, राम जन्मला ग सखी, स्वयंवर झाले सीतेचे, निरोप कसला माझा घेता, मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे, सेतू बांधारे सागरी, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, त्रिवार जय जय कार, लीन ते चारु ते सीते, अशी अनेक रागांरवर आधारीत प्रभु श्रीरामाचा जीवनपट या मुलांनी आपल्या गीतांद्वारे रसिकांसमोर सादर केला. राघवेंद्र पाठे, तन्वी कुलकर्णी, ईशा महल्ले व शार्दुल खरे यांनी निवेदकांची भुमिका सांभाळली.
आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगूळकर यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्त त्यांनी लिहिलेला ‘गीतरामायण’ हा संस्कार आणि संस्कृतीचा अमूल्य ठेवा पुढील पिढीपर्यंत पोचवावा या उद्देशाने पुणे येथील आकार संस्थेने बालकलाकारांचा ‘बाल गीत रामायण’ कार्यक्रमाचे नाशिककरांनी कौतुक केले.
यावेळी विश्वास नांगरे पाटील, यांचा आकारच्या संस्थापक चित्रा देशपांडे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर माझ्या नवऱ्याची बायको फेम अभिनेता अभिजीत खांडकेकर, सुखदा खांडकेकर आदींनी मनोमत व्यक्त केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्षमा देशपांडे हिने केले.मान्यवरांचा सत्कारगीतरामायणाचे कार्यक्रम प्रेक्षकांसमोर विविध रुपाने सादर करीत ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे काम करणाºया स्व. अनंतराव केळकर, स्व. बाळ भाटे, स्व. मोहन करंजीकर, रवींद्र अग्निहोत्री आदींचा गौरव करण्यात आला. त्यांच्या कुटुंबीयांनी स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.