बाल शिवकथाकार स्वराने जिंकली मने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 02:26 PM2019-12-26T14:26:30+5:302019-12-26T14:34:04+5:30

आपल्या कडक आवाजात शिवरायांच्या कार्याचा इतिहास सांगणाऱ्या नागपूरच्या बाल शिवकथाकार स्वरा ठेंगडी हिने उपस्थित शिवप्रेमींची मने जिंकली.

Bal Shivakathakar won the hearts with his voice | बाल शिवकथाकार स्वराने जिंकली मने

बाल शिवकथाकार स्वराने जिंकली मने

Next
ठळक मुद्देबाल शिवकथाकार स्वरा ठेंगडी हिने उपस्थित शिवप्रेमींची मने जिंकली. शिखर स्वामीनी महिला मंडळातर्फे व्याख्यान शिवरायांच्या क्लुप्त्या, गनिमी कावा, जिवलग सहकारी मावळे यांचे वर्णन

नाशिक : शिवरायांच्या जन्मापूर्वीचा महाराष्ट्र..., शिवजन्म...,शिवरायांचे बालपण..., परकीय सत्तेचे प्रजेवर होणारा अन्याय - अत्याचार...,स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा..., तोरणेवरील चढाई....असा टप्प्या टप्प्याने आपल्या कडक आवाजात शिवरायांच्या कार्याचा इतिहास सांगणाऱ्या नागपूरच्या बाल शिवकथाकार स्वरा ठेंगडी हिने उपस्थित शिवप्रेमींची मने जिंकली.
         शिखर स्वामीनी महिला मंडळातर्फे ऋतुरंग भवनात नागपूरची बाल शिव कथाकार स्वरा ठेंगडी हिचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. व्याख्यानाचे उद्घाटन आमदार राहुल ढिकले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिखर स्वामीनी महिला मंडळ अध्यक्षा आणि आयोजक नगरसेविका संगीता गायकवाड , नगरसेवक रमेश धोंगडे, डॉ विजय कºहाडे, योगेश भगत, प्रभाकर ठेंगडी, राजेश फोकणे, नितीन चिडे, शिरीष लवटे, हेमंत गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
        यावेळी बाल शिव कथाकार स्वरा ठेंगडी हिने फतेहखान, शाईस्तेखान, चंद्रराव मोरे यांच्यासोबतच्या लढाया, रायगडाची निर्मिती, संभाजी महाराज जन्म ,शिवरायांचे थोरले बंधू संभाजी याचा मृत्यू, कल्याण भिवंडी खजिना, आदिलशाहीपुढे निर्माण झालेली संभ्रमावस्था, स्वराज्य स्थापना, विविध किल्ल्यांवरील लढाया, स्वकीयांचा केलेला बंदोबस्त, अफजलखानाचा वध, स्वराज्याभिषेक सोहळा आदी प्रसंग आपल्या दमदार आवाजात अगदी हुबेहूब उभे केले. स्वरा हिने शिवरायांच्या क्लुप्त्या, गनिमी कावा, जिवलग सहकारी मावळे यांचे वर्णन करताना उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे करत सर्वांना मंत्रमुग्ध केले.

Web Title: Bal Shivakathakar won the hearts with his voice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.