सीएस फाउंडेशनमध्ये बेंगळुरूचा बालाजी देशात प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:17 AM2021-01-19T04:17:56+5:302021-01-19T04:17:56+5:30
देशभरात २६ व २७ डिसेंबर रोजी १४९ केंद्रांसह दुबईतील एका केंद्रावर ही परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा ...
देशभरात २६ व २७ डिसेंबर रोजी १४९ केंद्रांसह दुबईतील एका केंद्रावर ही परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल सोमवारी (दि.१८) नव्वी दिल्लीतील आयसीएसआय चॅप्टरने जाहीर केला आहे. यात देशभरातून ७०.२२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, यात बेगळुरू केंद्रातून परीक्षा देणाऱ्या बालाजी बी. जी. यांनी देशात प्रथम, तर जबलपूर केंद्रातून प्रिया जैन व भायंदर केंद्रातून अपर्ण अग्रवाल यांनी संयुक्तरीत्या दुसरा क्रमांक पटकावला आहे. भुवनेश्वर येथील निखिता जैन व उत्तर कोलकात्यातून चिराग अग्रवाल यांनी संयुक्तरीत्या तिसरा क्रमांक राखला आहे. ही परीक्षा देणारे उमेदवार आयसीएसआयच्या संकेतस्थळावर लॉगइन करून त्यांचा निकाल पाहून, गुणांचे तपशील डाऊनलोडही करू शकणार आहेत. दरम्यान, सीएस फाउंडेशनची पुढील परीक्षा ५ व ६ जून रोजी होणार असल्याची माहिती आयसीएसआयचे सचिव आशिष मोहन यांनी दिली आहे.