बालाजी मंदीर : २१ फूटी महागुढीचे नाशिककरांना आकर्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 03:39 PM2019-04-06T15:39:46+5:302019-04-06T15:40:32+5:30

सहस्त्रनाद वाद्य पथक नाशिकच्या वतीने गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर बालाजी मंदिरात २१ फूटांची अनोखी गुढी उभारली आहे. या गुढीच्या दर्शनासाठी गुढीपाडव्याच्या पुर्वसंध्येपासून नागरिकांनी मंदिरात गर्दी केली होती.

Balaji Temple: 21 footpath Mahagoodi attracts Nashikar | बालाजी मंदीर : २१ फूटी महागुढीचे नाशिककरांना आकर्षण

बालाजी मंदीर : २१ फूटी महागुढीचे नाशिककरांना आकर्षण

Next
ठळक मुद्देगुढीपाडव्याच्या पुर्वसंध्येपासून नागरिकांनी मंदिरात गर्दी केली होती

नाशिक : गुढीची उंची २१ फूटांची, त्यावर २१ प्रकारच्या फुलांची सहाफूटी माळ अन् २१ प्रांताचे वस्त्र, २१ आंबे मोहोर, कडूलिंबाच्या २१ डहाळ्या, २१ कडे अशी रचना असलेल्या आकर्षक आगळ्यावेगळ्या महागुढीचे दर्शन घेण्यासाठी नाशिककरांनी गंगापूर येथील बालाजी मंदिरात गर्दी केली होती.
ऊर्जा संचलित सहस्त्रनाद वाद्य पथक नाशिकच्या वतीने गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर बालाजी मंदिरात २१ फूटांची अनोखी गुढी उभारली आहे. या गुढीच्या दर्शनासाठी गुढीपाडव्याच्या पुर्वसंध्येपासून नागरिकांनी मंदिरात गर्दी केली होती. या गुढीची पारंपरिक पध्दतीने विधिवत पूजन करण्यात आले. शनिवारी (दि.६) सुर्यास्तापुर्वी उतरविण्यात आली. तसेच चैत्र मासारंभाच्या निमित्ताने या गुढीभोवती २१ चौरसफूटाचे चैत्रांगणही रेखाटण्यात आले होते. या चैत्रांगणाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व चिन्हांचा या चैत्रांगणाच्या रांगोळीत सहभाग करण्यात आला आहे.
अन्य सणांप्रमाणेच गुढीपाडव्याचा सणदेखील घरगुती न राहता सामाजिक व्हावा, सगळ्यांनी एकत्रित येऊन हा उत्सव साजरा करावा, या उद्देशाने सहस्त्रनाद वाद्य पथकाने महागुढी उभारण्याचा प्रयत्न यावर्षी केल्याची माहिती शौनक गायधनी, अमी छेडा यांनी दिली.

Web Title: Balaji Temple: 21 footpath Mahagoodi attracts Nashikar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.