पाताळेश्वर विद्यालयात बालकवी संमेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 05:49 AM2021-02-05T05:49:17+5:302021-02-05T05:49:17+5:30
------------------------------------------------------------------------ जखमी नागराजाला जीवदान सिन्नर: तालुक्यातील कुंदेवाडी येथे ट्रॅक्टरचा नांगराचा फाळ लागून जखमी झालेल्या नागराजाला सिन्नरच्या पशुधन खात्याने ...
------------------------------------------------------------------------
जखमी नागराजाला जीवदान
सिन्नर: तालुक्यातील कुंदेवाडी येथे ट्रॅक्टरचा नांगराचा फाळ लागून जखमी झालेल्या नागराजाला सिन्नरच्या पशुधन खात्याने जीवदान दिले आहे. कुंदेवाडी येथे नागराज जखमी झाल्यानंतर सर्पमित्र शुभम तारगे यांच्या पुढाकारातून त्यास सिन्नर पंचायत समितीच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात आणण्यात आले. पशुधन विकास अधिकारी डॉ. मिलिंद भणगे यांनी चार ते पाच इंच खोलवर जखम झालेल्या नागराजावर उपचार केल्यानंतर तो फणा काढून उभा राहिला. नाग फणा काढून उभा राहिल्यानंतर सर्वांचीच तारांबळ उडाली.
--------------------------------------
सिन्नरला सातजण कोरोनाबाधित
सिन्नर : शहर व तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांचे प्रमाण अत्यंत कमी होत असतांनाच गेल्या दोन दिवसात पुन्हा सात जण कोरोनाबाधित आढळून आले असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. त्यात शहा व गोंदे गावात प्रत्येकी एक, तर सिन्नरच्या कानडी मळ्यात दोन, साईबाबा नगर येथे एक, तर द्वारकानगरी आणि लोंढे गल्ली येथे प्रत्येकी एक असे सातजण कोरोनाबाधित आढळून आले आहे. नागरिकांनी मास्कचा वापर करण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
----------------------------------
वीजबिल प्रकरणी मनसेचे निवेदन
सिन्नर : वीजबिलात सूट देण्याचे ऊर्जामंत्र्यांनी आश्वासन न पाळल्याने ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यासह ऊर्जा सचिव व महावितरणचे कार्यकारी संचालक यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करण्यात आली. याबाबत सिन्नरचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना निवेदन देण्यात आले. मनसेच्या शिष्टमंडळाने राऊत यांनी भेट घेतली, तेव्हा त्यांनी आश्वासन दिले होते. तथापि, आश्वासन पाळले नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. यावेळी अॅड. दिलीप केदार, तालुकाध्यक्ष विलास सांगळे, निखील लहामगे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.