मालेगाव वकील संघाच्या अध्यक्षपदी बाळासाहेब पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:17 AM2021-03-09T04:17:44+5:302021-03-09T04:17:44+5:30
निवडणुकीत अध्यक्षपदाकरिता बाळासाहेब वामनराव पाटील, चंद्रशेखर जिभाऊ शेवाळे व चंद्रशेखर शिवाजी देवरे यांच्यात लढत होऊन बाळासाहेब वामनराव ...
निवडणुकीत अध्यक्षपदाकरिता बाळासाहेब वामनराव पाटील, चंद्रशेखर जिभाऊ शेवाळे व चंद्रशेखर शिवाजी देवरे यांच्यात लढत होऊन बाळासाहेब वामनराव पाटील हे सर्वाधिक मते मिळवून विजयी झालेत. उपाध्यक्ष पदासाठी अशोक श्यामराव देवरे व हिदायतुल्ला अब्दुल हकीम यांच्यात लढत होऊन अशोक श्यामराव देवरे हे सर्वाधिक मते मिळवून विजयी झाले.
सचिव पदासाठी नीलेश साहेबराव पाटील, हर्षद साहेबराव जाधव व रमेश बाबुराव पगारे यांच्यात लढत होऊन नीलेश पाटील हे सर्वाधिक मतांनी विजयी झाले. खजिनदार पदासाठी दीपक उत्तमराव पवार, जमाल नासीर निहाल अहमद व सुनील एकनाथ साळवे यांच्यात लढत होऊन दीपक उत्तमराव पवार हे विजयी झाले. ज्युनिअर प्रतिनिधी पदासाठी मुकुंद नानाजी शिंदे, सचिन उमाजी निकम, व सिद्दिकी जकीर अहमद यांच्यात लढत होऊन मुकुंद नानाजी शिंदे हे विजयी झाले आहेत. या निवडणूक प्रक्रियेत सह-सचिवपदी राग पुरुषोत्तम कुलकर्णी व महिला प्रतिनिधीपदी सुनीता टी. दोडे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
निवडणूक अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात शासनाच्या कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना अवलंबत प्रक्रिया पार पाडण्यात आली. प्रक्रियेत सी.एम आहेर यांनी मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कामकाज पहिले. त्यांना मनोज चव्हाण व सोहेल अन्सारी यांनी साहाय्य केले. सदर निवडणुकीचे आर्बिट्रेटर म्हणून बी.एल. लोखंडे यांनी कामकाज पाहिले.
..................
राग पुरुषोत्तम कुलकर्णी?