शेतीला बळकटी देण्यासाठी राज्यात बाळासाहेब ठाकरे स्मारक योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2020 11:03 PM2020-07-12T23:03:46+5:302020-07-13T00:18:19+5:30

शेती व्यवसायाला बळकटी देण्यासाठी आगामी पाच वर्षांसाठी संपूर्ण राज्यात बाळासाहेब ठाकरे स्मारक योजना राबविण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी येथे रविवारी (दि.१२) आढावा बैठकीत केली.

Balasaheb Thackeray Memorial Scheme in the state to strengthen agriculture | शेतीला बळकटी देण्यासाठी राज्यात बाळासाहेब ठाकरे स्मारक योजना

सटाणा येथे कृषी विभागाचा आढावा घेताना कृषिमंत्री दादा भुसे. समवेत आमदार दिलीप बोरसे, सभापती इंदूबाई ढुमसे, उपसभापती कान्हू अहिरे, साहेबराव सोनवणे, लालचंद सोनवणे आदी.

googlenewsNext
ठळक मुद्देसटाण्यात कृषिमंत्र्यांची घोषणा : बागलाण तालुक्यात शेती पाहणी दौरा; आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना

सटाणा : शेती व्यवसायाला बळकटी देण्यासाठी आगामी पाच वर्षांसाठी संपूर्ण राज्यात बाळासाहेब ठाकरे स्मारक योजना राबविण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी येथे रविवारी (दि.१२) आढावा बैठकीत केली.
बागलाण तालुक्यातील अंबासन, नामपूर, टेंभे खालचे, कºहे आदी ठिकाणी शेती पाहणी दौरा तसेच सटाण्यात आढावा बैठक आयोजित केली होती. त्याप्रसंगी भुसे बोलत होते. या योजनेत शेतकºयाने पिकविलेला माल साठविण्यासाठी अद्ययावत गुदाम, कोल्ड स्टोरेज,
प्रक्रियाउद्योग आणि वाहतूक यंत्रणा उभारण्याचे उद्दिष्ट राहणार असल्याचे नमूद करून या योजनेसाठी महिला शेती गट, फार्मर प्रोड्यूसर कंपनी तसेच शेतीगटांना प्राधान्य राहणार असल्याचे भुसे म्हणाले. बागलाण तालुक्यासाठी अतिरिक्त ५०० मेट्रिक टन खते उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे सांगून पंतप्रधान सन्मान योजनेचा लाभ प्रत्येक शेतकºयास कसा मिळेल, यासाठी महसूल यंत्रणेने तत्काळ आढावा घेण्याच्या सूचना भुसे यांनी प्रांताधिकाऱ्यांना दिल्या. पीककर्जाचा लाभ मिळेल यासाठी लक्षांक वाढविण्याचा, मेंढ्यांसाठी तत्काळ लसीकरण मोहीम सुरू करण्याचे आदेशही त्यांनी दिले. प्रारंभी भुसे यांनी टेंभे खालचे येथे फार्मर प्रोड्यूसर कंपनीला तसेच अंबासन येथील शेतीशाळेला भेट देऊन सीताफळबागेची पाहणी केली. यावेळी आमदार दिलीप बोरसे यांनी बागलाण तालुक्यात अर्ली द्राक्ष, उन्हाळा कांदा, डाळिंब या पिकांसाठी निर्यात केंद्र उभारण्यासाठी कृषी विभागाने चालना द्यावी, अशी मागणी केली.
याप्रसंगी प्रांताधिकारी विजयकुमार भांगरे, तहसीलदार जितेंद्र इंगळे-पाटील, गटविकास अधिकारी पांडुरंग कोल्हे, उपविभायीय कृषी अधिकारी देवरे, पंचायत समिती सभापती इंदूबाई ढुमसे, उपसभापती कान्हू अहिरे, साहेबराव सोनवणे, लालचंद सोनवणे, जयप्रकाश सोनवणे, डॉ. विलास बच्छाव, डॉ. प्रशांत सोनवणे आदी उपस्थित होते.
अर्ली द्राक्षाला गारपीट आणि पावसापासून संरक्षण मिळावे, यासाठी शासनाने प्रायोगिक तत्त्वावर प्लॅस्टिक अस्तरीकरण करण्याची योजना राबविण्याचा निर्णय घेतल्याची माहिती भुसे यांनी दिली. याचे आॅनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रि या सुरू झाली आहे. तसेच अर्ली द्राक्ष हंगामाला विमाकवच असावे म्हणून आमदार बोरसे यांनी केलेल्या मागणीचा विचार शासनस्तरावर सुरू असून, वर्षभरासाठीच्या विम्यात त्याचा समावेश करण्याचे सूतोवाच भुसे यांनी केले.

Web Title: Balasaheb Thackeray Memorial Scheme in the state to strengthen agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.