आयएसटीईकडून बाळासाहेब वाघ यांचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 03:07 PM2019-01-12T15:07:22+5:302019-01-12T15:09:37+5:30
गेल्या 50 वर्षांपासून तंत्रशिक्षण क्षेत्रात अतुलनीय योगदानाबद्दल के. के. वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांना इंडीयन सोसायटी फॉर टेक्नीकल एज्यूकेशन(आय.एस.टी.ई), नवी दिल्ली यांच्यातर्फे जीवन गौरव पुरस्काराने नुकतेच गौरविण्यात आले. ठाणे येथील 19 व्या महाराष्ट्र-गोवा राज्य विभागीय शिक्षक संमेलनात अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदचे(ए.आय.सी.टी.ई) उपाध्यक्ष डॉ. एम.पी. पुनिया यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
नाशिक : गेल्या 50 वर्षांपासून तंत्रशिक्षण क्षेत्रात अतुलनीय योगदानाबद्दल के. के. वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांना इंडीयन सोसायटी फॉर टेक्नीकल एज्यूकेशन(आय.एस.टी.ई), नवी दिल्ली यांच्यातर्फे जीवन गौरव पुरस्काराने नुकतेच गौरविण्यात आले. ठाणे येथील 19 व्या महाराष्ट्र-गोवा राज्य विभागीय शिक्षक संमेलनात अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदचे(ए.आय.सी.टी.ई) उपाध्यक्ष डॉ. एम.पी. पुनिया यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
बाळासाहेब वाघ हे के. के. वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष असून 2003 मध्ये स्थापित ‘असोसिएशन ऑफ दि मॅनेजमेंट्स ऑफ अन-एडेड इंजिनिअरींग कॉलेजेस ’ या राज्यस्तरीय नोंदणीकृत संस्थेचे गेल्या 15 वर्षापासून अध्यक्ष आहेत. तसेच 2005 मध्ये स्थापित ‘असोसिएशन ऑफ दि मॅनेजमेंट्स ऑफ पॉलिटेक्निक्स्’ व ‘असोसिएशन ऑफ दि मॅनेजमेंटस् ऑफ अॅग्रीकल्चर अॅण्ड अॅग्रीकल्चर अलाईड कॉलेजेस्’या राज्यस्तरीय नोंदणीकृत असलेल्या संस्थेच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही गेल्या 13 वर्षापासून समर्थपणे पेलत आहेत. ग्रामीण भागातील शेतकरी कुटूंबातील मुला-मुलींना तंत्रिक शिक्षणाची सोय व्हावी, यासाठी तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी शिक्षणात पाऊल टाकले. त्यांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल आय.एस.टी.इ संस्थेने लाईफ टाईम एक्सलेंस हा मानाचा मानला जाणार पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. या पुरस्कार सोहळ्याप्रसंगी कुलगुरू जी.बी. जाधव, आय.एस.टी.ई चे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह देसाई, तंत्रशिक्षण संचालनायाचे संचालक डॉ.अभय वाघ आणि महाराष्ट्र व गोवा येथील संस्थाचालक, प्राध्यापक आदी मान्यावर उपस्थित होते.