कावळ्यांना लागलाय बाळासाहेबांचा लळा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 10:38 PM2020-09-26T22:38:23+5:302020-09-27T00:45:18+5:30
त्र्यंबकेश्वर : पितृ पंधरवडा असो की दशिक्र या विधी असो यावेळी सर्वांचाच कावळ्याची आठवन येते. जेव्हा कावळा अन्नाला शिवत नाही. तासन्तास होऊनही कावळा घास उचलत नाही तेव्हा त्याचे महत्त्व पटते. मात्र कावळ्यांसह पक्ष्यांवर प्रेम करत त्यंची भूक नित्यनेमाने भागविणारे त्र्यंबकेश्वर येथील सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब सावंत यांची कहानी कही औरच आहे.
त्र्यंबकेश्वर : पितृ पंधरवडा असो की दशिक्र या विधी असो यावेळी सर्वांचाच कावळ्याची आठवन येते. जेव्हा कावळा अन्नाला शिवत नाही. तासन्तास होऊनही कावळा घास उचलत नाही तेव्हा त्याचे महत्त्व पटते. मात्र कावळ्यांसह पक्ष्यांवर प्रेम करत त्यंची भूक नित्यनेमाने भागविणारे त्र्यंबकेश्वर येथील सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब सावंत यांची कहानी कही औरच आहे. त्यांची दुचाकी चौकात येताच त्यांच्या डोक्यावर उडत थेट अटल अखाड्यापर्यंत कावळे बाळासाहेबांचा पाठलाग करतात. अटल अखाड्यासमोरील मैदानातखाऊ, शेव, पापडी, भेळ वगैरे काढेपर्यंत लहानमुलांप्रमाणेच कावळ्यांनाही धीर नसतो. काही वेळेस तर त्यांच्या हातातून खाऊ ओरबाडून पळतात. अवघ्या काही मिनिटात आणलेला खाऊ संपतो.
ही कहानी नसून सत्य घटना आहे त्र्यंबकेश्वरमधील सामाजिक कार्यकर्ते माजी नगरसेवक बाळासाहेब गणपत सावंत यांच्या भूतदयेची. बाळासाहेब कावळ्यांना लळा लावणारे व्यक्तिमत्व आहे. दररोज सकाळी 6 ते 7 व सायंकाळी 6 ते 7 असे दिवसातुन दोन वेळा कावळ्यांना खाऊ देण्याचा उपक्र म राबवितात. ते कुठे गावाला गेले तर सहका-यावर जबाबदारी सोपऊन जातात.पण कावळ्याचा खुराक बंद पडू देत नाहीत. बाळासाहेब सावंत या व्यक्तिमत्वाने सामाजिक भावनेने अनेक लोक उपयुक्त उपक्र म राबवलेले आहेत. त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेने बांधलेल्या वैकुंठभूमीची दयनीय अवस्था होती. पण पालिकेकडे वारंवार पाठपुरावा करु न पालिकेने सुंदर असे वैकुंठधाम उभारले त्या ठिकाणी गार्डनची संकल्पना राबवली. गावातील एक दानशुर नागरिक भरत नार्वेकर यांना त्यांनी ही संकल्पना सांगुन पिताश्रींच्या नावाने एक शववाहिकाही तयार करुन घेतली. श्रध्दांजलीपर कार्यक्र मासाठी माइकसह मायक्र ोफोनची व्यवस्था केली आहे. गरीब व आजारी माणसाला दवाखाना पैशांची मदत करायला लोकवरूगणीतुन बाळासाहेब तयारच असतात. बाळासाहेब म्हटले की साधा पांढरा पायजमा शर्ट व डोक्यावर टोपी असा पेहराव. हा माणुस जिल्ह्यात सामाजिक कार्यकत्ता म्हणुन ओळखला जातो. दीर्घ आजारी माणसांना विशिष्ट गादी असलेला पलंग दुरवरु न शव आणावयाचे असल्यास त्यासाठी शवपेटी कोणतेही भाडे न घेता त्यांच्याकडून दिली जाते. सध्या पालिकेकडे शवविच्छेदन कक्षासाठी जागा व दशनाम गोसावी समाजाच्या दफनभूमीसाठी जागेसाठी बाळासाहेबांचा पाठपुरावा सुरु आहे.