बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी शिवसेनेत धुमश्चक्री !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 04:08 PM2017-11-17T16:08:35+5:302017-11-17T16:10:10+5:30

Balasaheb's Smriti daily Shivsenaet Dhumashchri! | बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी शिवसेनेत धुमश्चक्री !

बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी शिवसेनेत धुमश्चक्री !

Next
ठळक मुद्देसेना भवनासमोर प्रकार : पदाधिकाºयाने सैनिकाला बदडले

नाशिक : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतीदिनानिमित्त आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम आटोपल्यानंतर शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाच्या बाहेर सेनेच्या उप महानगर प्रमुखाने त्याच्या साथीदारासह शिवसैनिकाला भर रस्त्यात बडदल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली आहे. विशेष म्हणजे कार्यालयाच्या बाहेर ही हाणामारी सुरू असताना सेनेच्या एकाही पदाधिका-याने त्यात हस्तक्षेप करण्याचा साधा प्रयत्नही न केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात असून, ज्याला बदडले त्याच्या विषयी सेनेकडे यापुर्वीच तक्रारींचा पाऊस असल्याने जे झाले ते योग्यच असे म्हणत सा-यांनीच या वादापासून स्वत:ला दूर करून घेतले आहे.
जिल्हा शिवसेनेच्यावतीने शिवसेना कार्यालयात सकाळी अकरा वाजता बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजीत केला होता. या कार्यक्रमास जिल्हा प्रमुख, महानगरप्रमुखासह प्रमुख पदाधिकारी, नगरसेवकांसह शिवसैनिकही मोठ्या संख्येने हजर होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर सर्व जण कार्यालयातून बाहेर पडत असतानाच उपमहानगर प्रमुख शरद देवरे यांची माहिती अधिकार कार्यकर्ता राजेंद्र नानकर याच्याशी नजरानजर झाली. गेल्या काही महिन्यांपासून नानकर हा देवरे यांनी स्थापन केलेल्या रोजगार संस्थेविषयीची माहिती शासकीय कार्यालयाकडून माहिती अधिकार कायद्यान्वये मागत होता. यापुर्वीही नानकर यांनी अनेक शासकीय अधिका-यांची वैयक्तीक माहिती मागविल्याचे प्रकरणे असून, लोकशाही दिन व भ्रष्टाचार निर्मुलन तक्रार दिनात त्याने अधिकाºयांच्या विरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत. अशा तक्रारी करून तो अधिका-यांना त्रास देत असल्याबाबत सेनेकडे मोठ्या प्रमाणावर तक्रारी आल्याने देवरे यांनी त्याला जाब विचारला असता त्यातून धुमश्चक्री उडाली व देवरे यांनी नानकर यांना भररस्त्याच बदडण्यास सुरूवात केली. यावेळी देवरे यांच्या सहका-यांनीही नानकर याला बेदम मारहाण केली. शिवसेना कार्यालयाबाहेर घडत असलेल्या या प्रकारात एकही शिवसैनिक मारामारी सोडविण्यास पुढे धजावला नाही, अखेर मारहाणीत चांगलाच मार बसलेल्या नानकर याने आपली दुचाकी तेथेच सोडून पळ काढला. हा सारा प्रकार घडत असताना शिवसेना जिल्हा प्रमुख, महानगरप्रमुख यांनी बाहेर येण्याचे सौजन्यही दाखविले नाही. मात्र बाळासाहेबांच्या स्मृतीदिनीच हा प्रकार घडल्याने त्याची जोरदार चर्चा होत आहे.

Web Title: Balasaheb's Smriti daily Shivsenaet Dhumashchri!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.