भाजीपाला पिकामुळे बळीराजाला दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2020 02:36 PM2020-07-09T14:36:56+5:302020-07-09T14:37:23+5:30
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील कादवा परिसरात शेतक-यांनी भाजीपाला पिकांवर अधिक भर दिल्याने दिलासा मिळाला आहे. रब्बी हंगामात भरपूर भांडवल खर्च करून ही या हंगामातील कोणत्याही पिकांने साथ दिली नाही.
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील कादवा परिसरात शेतक-यांनी भाजीपाला पिकांवर अधिक भर दिल्याने दिलासा मिळाला आहे. रब्बी हंगामात भरपूर भांडवल खर्च करून ही या हंगामातील कोणत्याही पिकांने साथ दिली नाही. त्यामुळे बळीराजांच्या डोळ्यात अश्रू आले होते. एका बाजूला कोरोना व दुसरे बाजुस पिकविलेल्या शेती मालासाठी कोणत्याही प्रकारची भावाची हमी नसल्यामुळे बळीराजाची द्विधावस्था होऊन गेली होती.
खरीप हंगामासाठी नियोजन करीत शेतकरी वर्गाने गेलेले भांडवल भरून काढण्यासाठी भाजीपाला पिकांला पसंती दिली आहे. त्यामध्ये म्हेळुसके, करजंवण, ओझे, अवनखेड, लखमापूर, दहेगाव वागळुद इ भागातील शेतकरी मेथी,वांगी, कोबी, कोथिंबीर, गवार, दोडकी, कारले, गिलके, सेपु, बीट, लसूण इ.भाजीपाला पिके घेऊन. हातामध्ये नगदी भांडवल तयार करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.
पिकविलेला भाजीपाला शेतकरी वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन विकत असल्यामुळे बळीराजांला गेलेले भांडवल तयार करण्यास मदत होत आहे. व्यापारी वर्गाला काही भाजीपाला व राहिलेला भाजीपाला स्वत: विकण्यावर शेतकरी वर्गांने मोठ्याप्रमाणावर भर दिल्याने, पुढील पिक घेण्यासाठी थोडे थोडे भांडवल तयार करीत आहे.