बळीराजाची जागा घेतली ट्रॅक्टरने, कनाशीत साजरा झाला ट्रॅक्टर पोळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:18 AM2021-09-08T04:18:45+5:302021-09-08T04:18:45+5:30
------------------------ संकल्पना प्रत्यक्षात भारत हा कृषिप्रधान देश आहे. येथील ग्रामीण अर्थव्यवस्था पूर्णतः शेतीवर अवलंबून आहे. ती कसण्यासाठीचा महत्त्वपूर्ण घटक ...
------------------------
संकल्पना प्रत्यक्षात
भारत हा कृषिप्रधान देश आहे. येथील ग्रामीण अर्थव्यवस्था पूर्णतः शेतीवर अवलंबून आहे. ती कसण्यासाठीचा महत्त्वपूर्ण घटक म्हणजे बैलजोडीला ओळखले जाते. वर्षभर शेतीत राबल्यानंतर त्यांचे ऋण काहीअंशी फेडता यावेत म्हणून महाराष्ट्रात बैलपोळ्याची पद्धत रूढ झाली. पण वाढती लोकसंख्या, कुटुंबासह शेतीचे विभाजन, खेड्यांचे होत असलेले शहरीकरण, मजूरटंचाई व शेतीचे आधुनिकीकरण अशा अनेक कारणांनी गुरांसह बैलांचा वापर कमी झाला व त्याची जागा ट्रॅक्टरसारख्या यंत्रांनी घेतली व जवळपास ऐंशी टक्के शेतीची कामे याद्वारेच होऊ लागली. ट्रॅक्टरमालकांनी बैलपोळ्याची पारंपरिक पद्धती जोपासत आधुनिक पद्धतीने पोळा साजरा करण्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरविली.
-----------------------------
आधुनिक पद्धतीने शेतीला सुरुवात झाल्यानंतर मशागतीसाठी ट्रॅक्टरचा प्रवेश शेतीत झाला. शेतकऱ्याचा मित्र म्हणवणारा बैल शेतीतून हळूहळू हद्दपार झाला. बैलांच्या कमतरतेमुळे सर्वत्र शेतीची कामे ट्रॅक्टरद्वारे केली जातात. बैल पोळ्याबरोबर ट्रॅक्टर पोळा साजरा करावा म्हणून बैलजोडीला प्रथम प्राधान्य देत पाठीमागे गावातून २५ ट्रॅक्टरची मिरवणूक काढून बैलपोळा साजरा केला.
- सुनील देसाई, कनाशी (०७ कळवण १)
070921\07nsk_17_07092021_13.jpg
०७ कळवण १