पावसाच्या लहरीपणामुळे बळीराजा चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2020 06:28 PM2020-08-04T18:28:48+5:302020-08-04T18:29:16+5:30

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील बरीच गावांना पावसाने आपला लहरी पणा दाखवत दडी मारली आहे. त्यामुळे बरीच पिके पाणी विना तडफडण्यास सुरु वात झाल्यामुळे या भागातील शेतकरी वर्गाच्या भुवया उंचावल्या आहेत. आठवड्यापूर्वी लखमापूर, करंजवण, दहेगाव वागळुद, ओझे, अवनखेड, परमोरी, ओझरखेड आभागात पावसाने दमदार हजेरी लावली होती. परंतु आता मात्र भर पावसाळ्यात पाऊस नाही. पण पावसाळी वातावरण भरपूर असुन पावसाचा एक थेंब ही पडत नसल्यामुळे दिंडोरी तालुक्यातील बळीराजांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.

Baliraja is worried due to the erratic nature of the rain | पावसाच्या लहरीपणामुळे बळीराजा चिंतेत

पावसाच्या लहरीपणामुळे बळीराजा चिंतेत

googlenewsNext
ठळक मुद्देदिंडोरी तालुक्यातील : पिकांची पाणी विना तडफड

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील बरीच गावांना पावसाने आपला लहरी पणा दाखवत दडी मारली आहे. त्यामुळे बरीच पिके पाणी विना तडफडण्यास सुरु वात झाल्यामुळे या भागातील शेतकरी वर्गाच्या भुवया उंचावल्या आहेत. आठवड्यापूर्वी लखमापूर, करंजवण, दहेगाव वागळुद, ओझे, अवनखेड, परमोरी, ओझरखेड आभागात पावसाने दमदार हजेरी लावली होती. परंतु आता मात्र भर पावसाळ्यात पाऊस नाही. पण पावसाळी वातावरण भरपूर असुन पावसाचा एक थेंब ही पडत नसल्यामुळे दिंडोरी तालुक्यातील बळीराजांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.
खरीप हंगाम शेतकरी वर्गाला तारे वरची कसरत करायला लावत असुन जर जोमात वाढणारी दमदार पिकं आता पाण्याविना जातील की काय. यांची भीती निर्माण झाली आहे. आकाशात पावसाळी ढग भरपूर पण पाऊस पडत नाही. यासाठी शेतकरी वर्गाने महादेवाला साकडे घातले आहे. अत्यंत महागडे किंमतीचे बी बियाने खरेदी करून ते पेरणी केली. परंतु आता मात्र तेच पिके जोमाने वाढत असताना पावसाची कमतरता शेतकरी वर्गा समोर नव्या संकटाच्या रूपाने उभी राहिली आहे.
एक हंगाम गेला की दुसरा हंगाम ही नवीन नवीन संकटे घेऊन उभा राहातो.तेव्हा शेती मधील आवाहने कशी पेलवायची ही गहन समस्या शेतकरी वर्गापुढे भयानक रूपाने उभी राहिली आहे. देशाचा पोशिंदा शेतकरी हा कायम आर्थिक संकटात सापडत असल्यामुळे पुढे शेती कशी करायची, भांडवल कसे तयार करायचे, पिकवलेल्या शेती मालाला हमी भाव मिळाला नाही तर संसार कसा चालवावा. तसेच वेगवेगळ्या ठिकाणीहुन घेतलेले कर्ज कसे फेडावे या विवेचनेत बळीराजा सापडला आहे.
प्रतिक्रि या...
मागील वर्षी व यंदाच्या हंगामात शेतकरी वर्ग मेटाकूटीला आला आहे. कारण कुठल्याही पिकाला हमी भाव नाही. पैसा वेळेवर मिळत नाही. त्यामुळे प्रत्येक हंगामातील आवाहने वेगवेगळी आता शेती धंदा सोडावा की काय ही समस्या आम्हाला भेडसावत आहे.
- हिरामण मोगल, शेतकरी, लखमापूर.

Web Title: Baliraja is worried due to the erratic nature of the rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.