बालकविता करताना बालमन जाणावे : खांडगे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 12:59 AM2018-11-20T00:59:14+5:302018-11-20T00:59:37+5:30

शिक्षक हे मुलांचे भावविश्व जवळून पाहत असतो. तसेच शिक्षक स्वत:तील बालमन सांभाळून कविता करतो. बालकविता करताना बालमन समजून घ्यावे लागते. तसेच मुलांचे भावविश्व समृद्ध करण्यासाठी अन्य भाषांमधील कवितांचा अनुवाद झाला पाहिजे, असे प्रतिपादन लेखिका मंदा खांडगे यांनी केले.

 Balman should know during childhood: Khandge | बालकविता करताना बालमन जाणावे : खांडगे

बालकविता करताना बालमन जाणावे : खांडगे

Next

नाशिक : शिक्षक हे मुलांचे भावविश्व जवळून पाहत असतो. तसेच शिक्षक स्वत:तील बालमन सांभाळून कविता करतो. बालकविता करताना बालमन समजून घ्यावे लागते. तसेच मुलांचे भावविश्व समृद्ध करण्यासाठी अन्य भाषांमधील कवितांचा अनुवाद झाला पाहिजे, असे प्रतिपादन लेखिका मंदा खांडगे यांनी केले.  कवयित्री माया धुप्पड लिखित ‘हत्तीचा व्यायाम’ वा ‘आभाळाची छत्री’ या बालकविता संग्रहाचे प्रकाशन करताना खांडगे बोलत होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शारदा शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष सुवर्णा मालपाणी, प्रकाश पायगुडे, सुनीता पवार, किरण केंद्रे, वि. दा. पिंगळे आदी उपस्थित होते.  यावेळी खांडगे म्हणाल्या की, धुप्पड यांच्या कवितेला खांदेशच्या मातीचा वारसा लाभला आहे. याप्रसंगी धुप्पड यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, बालमनाशी जिव्हाळ्याचा संवाद साधणे ही बालकविता असते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत चौघुले यांनी केले. शीतल धुप्पड यांनी आभार मानले.

Web Title:  Balman should know during childhood: Khandge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.