ठाणगावला चाऱ्याच्या गंजीस आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 00:32 IST2020-03-03T00:31:35+5:302020-03-03T00:32:05+5:30

पाटोदा : येवला तालुक्यातील ठाणगाव येथील एका शेतकºयाने आपल्या जनावरांसाठी गावानजीक रचून ठेवलेल्या चाºयाच्या गंजीस सोमवारी (दि.२) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. यात सुमारे दहा ट्रॅक्टर चारा जळून खाक झाला आहे. नागरिकांनी वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला.

Balmy fire | ठाणगावला चाऱ्याच्या गंजीस आग

ठाणगावला चाऱ्याच्या गंजीस आग

ठळक मुद्देजनावरांचा चाºयाचा प्रश्न गंभीर बनला

लोकमत न्यूज नेटवर्क
पाटोदा : येवला तालुक्यातील ठाणगाव येथील एका शेतकºयाने आपल्या जनावरांसाठी गावानजीक रचून ठेवलेल्या चाºयाच्या गंजीस सोमवारी (दि.२) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. यात सुमारे दहा ट्रॅक्टर चारा जळून खाक झाला आहे. नागरिकांनी वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला.
रावसाहेब जाधव यांनी घरापासून दोन अडीचशे फुटावर पश्चिम भागात जनावरांसाठी सुमारे दहा ट्रॅक्टर ट्रॉली मक्याचा चारा रचून ठेवला होता. सोमवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास गंजीस अचानक आग लागल्याने संपूर्ण चारा जळून खाक झाला.
आगीचे कारण समजू शकले नाही. चाºयास आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील ग्रामस्थांनी धाव घेत पाण्याचा मारा करत आग विझवली. संपूर्ण चारा खाक झाल्याने जनावरांचा चाºयाचा प्रश्न गंभीर बनला आहे. जाधव यांना महागडा चारा खरेदी करून पशुधन जतन करावे लागणार आहे. आग विझविण्यासाठी रमेश शेळके, सुनील जाधव, सचिन भवर, अक्षय जाधव, संपत शेळके, कृष्णा शिरसाठ, राम वाणी, राम शिरसाठ, नामदेव शिरसाठ, देवचंद शेळके, फकीर शेळके, अनिल जाधव, कृष्णा कव्हत, माणिक भवर, नितीन शेळके आदींसह ग्रामस्थांनी प्रयत्न केले.

Web Title: Balmy fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.