कुस्तीस्पर्धेत बाळू बोडकेस सुवर्णपदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 02:47 PM2018-11-21T14:47:42+5:302018-11-21T14:48:15+5:30
नांदूरवैद्य -: इगतपुरी तालुक्यातील साकुर फाटा येथील गुरु हनुमान कुस्ती आखाड्यात कुस्तीचे धडे गिरवणारा ञ्यंबकेश्वर येथील प्रसिद्ध कुस्तीपटू बाळू बोडके याने हरियाणा येथील किवाणी येथे झालेल्या आॅल इंडिया युनिव्हिर्सटी चॅम्पियन स्पर्धेत अंतिम सामन्यात सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.
नांदूरवैद्य -: इगतपुरी तालुक्यातील साकुर फाटा येथील गुरु हनुमान कुस्ती आखाड्यात कुस्तीचे धडे गिरवणारा ञ्यंबकेश्वर येथील प्रसिद्ध कुस्तीपटू बाळू बोडके याने हरियाणा येथील किवाणी येथे झालेल्या आॅल इंडिया युनिव्हिर्सटी चॅम्पियन स्पर्धेत अंतिम सामन्यात सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. व्यंकटराव हिरे पंचवटी महाविद्यालयाचे नेतृत्व केलेल्या बाळू बोडके याने नाशिक जिल्ह्याचे नाव देशभर झळकवले असून पन्नास वर्षांच्या इतिहासात प्रथमच आॅल इंडिया युनिव्हिर्सटी चॅम्पियन स्पर्धेत अशी कामिगरी करणारा तो पहिलाच कुस्तीपटू ठरला आहे.आपल्या वडिलांकडून कुस्तीचे बाळकडू मिळालेल्या बाळूने महाराष्ट्र चॅम्पियन, महाराष्ट्र केसरीत ७० किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळवले असून तसेच विविध स्पर्धामधून त्याने नेत्रदीपक कामगिरी करत यश संपादन केले आहे. विना मॅटचा सराव करणारा बाळू बोडके सुवर्णपदकाचा मानकरी झाला असून जर आखाड्यातील कुस्तीपटूंना पुर्ण मॅटवर सराव करण्यास मिळाले तर भविष्यात असे अनेक प्रतिभावान आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार झाल्यानंतर भारताचे नेतृत्व आमच्या गुरु हनुमान कुस्ती आखाड्यातील खेळाडू करतील यात शंकाच नाही असे मत यावेळी गुरु हनुमान आखाड्याचे वस्ताद व प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू ज्ञानेश्वर शिंदे यांनी मांडले.त्यास कृष्णा पाटील, उप महाराष्ट्र केसरी समाधान पाटील,गुरु हनुमान आखाड्याचे वस्ताद व प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय खेळाडू ज्ञानेश्वर शिंदे, प्रशिक्षक प्रवीण सुर्यवंशी,भरवीरचे सरपंच दत्तू जुंद्रे पाटील, चंद्रभान शिंदे, प्रसिद्ध कुस्तीपटू संदिप गायकर, युवराज उगले, आनंदा सामोरे, तुकाराम सहाणे, ज्ञानेश्वर सहाणे, विष्णू सहाणे आदींचे मार्गदर्शन लाभले.