बेमोसमी पावसाने जनजीवन विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 05:41 PM2018-11-20T17:41:25+5:302018-11-20T17:41:37+5:30
सिन्नर : शहरात सोमवार (दि.१९) सायंकाळी ५.३० ते ७ वाजेच्या सुमारास बेमोसमी पावसाने सुमारे दीड तास हजेरी लावली. त्यामुळे हवेत अधिकच गारवा निर्माण झाला.
सिन्नर : शहरात सोमवार (दि.१९) सायंकाळी ५.३० ते ७ वाजेच्या सुमारास बेमोसमी पावसाने सुमारे दीड तास हजेरी लावली. त्यामुळे हवेत अधिकच गारवा निर्माण झाला.
तालुक्यातील पूर्व भागातील वावी, पांगरी, दुसंगवाडी, मिठसागरे, पिंपरवाडी आदी गावामंध्ये सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास तुरळक पाऊस झाला. मात्र वडांगळी, निमगाव सिन्नर, बारागापिंप्री आदी भागातदेखील बेमोसमी पावसाने हजेरी लावली. पश्चिम पट्यातील ठाणगाव परिसरात वीजांच्या कडकडाटासह पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. आता हा आवकाळी पाऊस नुकसानकारक असला तरी बरसल्यामुळे नागरिकांना हायसे वाटले.