जिल्हा परिषदेत खासगी वाहनांना बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 01:17 AM2018-05-22T01:17:42+5:302018-05-22T01:17:42+5:30
नाशिक : जिल्हा परिषदेच्या आवारात कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतर लोक वाहने उभी करून निघून जात असल्याने निर्माण होणाºया वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेऊन मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी जिल्हा परिषद आवारात खासगी वाहनांना बंदी केली असून, जिल्हा परिषदेचे ओळखपत्र असणाºयांचीच वाहने आवारात यापुढे उभी राहणार आहेत. सायंकाळी स्वत: मुख्य कार्यकारी अधिकारी गिते यांनी गेटवर उभे राहून ओळखपत्राची तपासणी केली.

जिल्हा परिषदेतील वाहततळाचा मुद्दा अत्यंत ज्वलंत असून, सदस्य, पदाधिकारी आणि बाहेरील व्यक्तींच्या वाहनामुळे वाहनतळावर वाहने उभी करणे कठीण होते. जिल्हा परिषदेची दर्शनी बाजू आणि मागील बाजूस नवीन इमारतीसमोरदेखील मोठ्या प्रमाणात वाहने उभी केली जात असल्याने पायी चालणेदेखील कठीण होते. जिल्हा परिषदेतील कर्मचाºयांव्यतिरिक्त परिसरातील बॅँका, खासगी व्यावसायिकांचे कर्मचारी जिल्हा परिषदेच्या आवारात वाहने उभी करून निघून जात होते. यामुळे संपूर्ण इमारतीला दुचाकी वाहनांचा वेढा पडलेला असायचा. मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी आता याप्रकाराला आळा घातला असून, जिल्हा परिषदेचे आवार मोकळे झाले आहे.
जिल्हा परिषदेच्या आवारात जिल्हा परिषदेच्या कर्मचाºयांव्यतिरिक्त अन्य खासगी वाहनधारक वाहने लावत असल्याची बाब निदर्शनास आल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी स्वत: जिल्हा परिषदेच्या गेटवर उभे राहून वाहनधारकांच्या ओळखपत्राची तपासणी केली. यापुढे ओळखपत्राशिवाय कुणालाही जिल्हा परिषद आवारात वाहन लावण्यास मनाई करण्यात येणार असून, अनधिकृतपणे वाहन लावल्यास कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना डॉ. गिते यांनी प्रशासन विभागाला दिल्या आहेत.
पार्किंगची नवीन जागा
जिल्हा परिषद आवारात वाहन पार्किंगची मोठी समस्या निर्माण होत असून, यासाठी डॉ. गिते यांनी जिल्हा परिषदेच्या मागील बाजूस (नवीन इमारतीसमोर नाही) वाहन लावण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. मात्र जिल्हा परिषदेच्या कर्मचाºयांच्या संख्येपेक्षा अधिक वाहने पार्किंगमध्ये उभी केली जात असल्याने सदरची वाहन बाहेरील व्यक्तींची असल्याचे दिसून आले आहे. सोमवारी सायंकाळी सुटी झाल्यानंतर डॉ. गिते यांनी गेटवर उभे राहून कर्मचाºयांच्या ओळखपत्रांची तपासणी केली. यापुढे सकाळी येताना व सायंकाळी जाताना सर्व वाहनधारकांचे ओळखपत्र तपासूनच त्यांना आत सोडले जाणार आहे.