ंमुदतबाह्य मिठाई विक्रीवर बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 10:18 PM2020-03-24T22:18:08+5:302020-03-25T00:19:13+5:30

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्य सरकारने सध्या संचारबंदी लागू केली असून, त्यामुळे जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व प्रकारचे दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशा परिस्थितीत मिठाई दुकानदारांनी तयार केलेल्या मिठाई या काळात खराब होण्याची शक्यता असल्याने मिठाई विक्रेत्यांना मुदतबाह्य मिठाई विक्री करण्यास बंदी घालण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त चंद्रकांत साळुंखे यांनी दिली आहे.

Ban on sale of non-expired sweets | ंमुदतबाह्य मिठाई विक्रीवर बंदी

ंमुदतबाह्य मिठाई विक्रीवर बंदी

Next
ठळक मुद्देकोरोना प्रादुर्भाव : कारवाई करण्याचा प्रशासनाचा इशारा

नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्य सरकारने सध्या संचारबंदी लागू केली असून, त्यामुळे जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व प्रकारचे दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशा परिस्थितीत मिठाई दुकानदारांनी तयार केलेल्या मिठाई या काळात खराब होण्याची शक्यता असल्याने मिठाई विक्रेत्यांना मुदतबाह्य मिठाई विक्री करण्यास बंदी घालण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त चंद्रकांत साळुंखे यांनी दिली आहे.
कोरोना विषाणुमुळे उद््भवलेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी शासनस्तरावर योग्य त्या उपाययोजना आखण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून दि. २२ मार्च रोजी जनता कर्फ्यू व दि. २३ पासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीतून अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तू जसे, दूध, किराणा, भाजीपाला या व्यतिरिक्त सर्व व्यवसाय बंद करण्यात आले आहेत.
त्यामुळे सदर विक्री संचारबंदी कालावधीत कोणीही मिठाईची विक्री अथवा मोफत वाटप करू नये किंवा मानवी सेवनासाठी वाटप करण्यात येऊ नये. सध्याच्या जागतिक आपत्तीच्या परिस्थितीत पुन्हा कोणतीही आपत्तीजनक परिस्थिती उद््भवेल अशी कृती कोणीही करू नये. असे करताना आढळून आल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला असून, गुढीपाडव्यानिमित्त जनतेने बाहेरील मिठाईऐवजी घरी तयार केलेली मिठाईचे सेवन करावे, असे आवाहनही साळुंके यांनी केले आहे.
विषबाधेची शक्यता
मिठाई पदार्थ हे अत्यावश्यक व्यापारात मोडत नाहीत त्यामुळे हा व्यवसायही बंद आहे. त्यामुळे मिठाई उत्पादक व व्यापाऱ्यांकडे काही प्रमाणात मिठाई शिल्लक असू शकते. व्यापाऱ्यांकडून मिठाईची सर्वोत्तम दिनांकाची मुदत संपल्यानंतर विक्री होऊ शकते. बहुतेक मिठाई प्रामुख्याने दूध व दुग्धजन्य पदार्थ यांसारख्या नाशवंत पदार्थापासून तयार करण्यात येते. मुदत बाह्य मिठाईच्या सेवनाने अन्न विषबाधेसारखे प्रसंग उद््भवू शकतात.

Web Title: Ban on sale of non-expired sweets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.