साइडपट्ट्यांवर अखेर मलमपट्टी

By admin | Published: July 18, 2016 12:00 AM2016-07-18T00:00:01+5:302016-07-18T00:53:14+5:30

नामपूर-ताहाराबाद रस्ता : बांधकाम विभागाने घातले लक्ष; ठोस कामाची अपेक्षा

The bandage on the sides | साइडपट्ट्यांवर अखेर मलमपट्टी

साइडपट्ट्यांवर अखेर मलमपट्टी

Next

  द्याने : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे मृत्यूचा सापळा बनलेल्या नामपूर-ताहाराबाद रस्त्याच्या दुरुस्तीला मलमपट्टी स्वरूपात का असेना मात्र प्रारंभ झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी काही अंशी समाधान व्यक्त केले आहे.
द्याने ते ब्राह्मणपाडे गावापर्यंत रस्त्याच्या साइडपट्ट्या खोल गेल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. दुरवस्था झालेल्या या रस्त्यावर अनेकांना जीव गमवावे लागले, तर काहींना अपंगत्व आले आहे. या वृत्ताची दखल घेत संबंधित विभागाने साइडपट्ट्यांवर मुरूम, मातीची मलमपट्टी करण्याचे काम हाती घेतले आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नामपूर-ताहाराबाद रस्त्यावरील साइडपट्ट्यांमुळे अनेकदा साइडपट्ट्यांवर अखेर मलमपट्टीवाहनचालकांना खोल गेलेल्या साईडपट्ट्यांचा सामना करावा लागत असे. यातून अनेक वेळा वादाचे प्रकार घडत. अशा स्थितीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांकडे पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत असत. त्यामुळेही अपघात घडत असताना थातूरमातूर कारवाई करण्यावर भर देण्यात येत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. गुजरात राज्यात जाण्यासाठी हा सोयीचा मार्ग असल्याने वाहनांची वर्दळ असते. पावसाळ्यात रस्त्यावरील नादुरुस्त साइडपट्ट्यांमुळे अनेक वाहने घसरल्याच्या घटना घडल्या असताना रस्ता रूंदीकरण कामाचं घोडं अडलंय तरी कुठे? असा प्रश्न प्रवाशांना पडला होता. अनेकदा निवेदने, रास्ता रोको आंदोलन केले. ताहाराबादपासून ब्राह्मणपाडे गावापर्यंत रस्ता रूंदीकरण झाले असले तरी आसखेडा गावाजवळील शाळेजवळ साईडपट्ट्या खोदल्या गेल्या असल्याने त्वरित काम पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)

Web Title: The bandage on the sides

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.