बंदीवानांनी क्र यशक्तीचा उपयोग देशहितासाठी करावा : सावरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 12:04 AM2018-06-18T00:04:42+5:302018-06-18T00:04:42+5:30

बंदीवानांमधील क्रयशक्ती ही राष्ट्रहितासाठी उपयोगी कशी पडेल याचा विचार त्यांनीच स्वत:च्या पातळीवर करावा तसेच तिथून बाहेर आल्यानंतर त्या अनुषंगाने आपापल्या पातळीवर कार्य करण्यास प्रारंभ करावा, असे विचार स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी व्यक्त केले.

 Bandwars should use krishti for patriotism: Savarkar | बंदीवानांनी क्र यशक्तीचा उपयोग देशहितासाठी करावा : सावरकर

बंदीवानांनी क्र यशक्तीचा उपयोग देशहितासाठी करावा : सावरकर

Next

नाशिकरोड : बंदीवानांमधील क्रयशक्ती ही राष्ट्रहितासाठी उपयोगी कशी पडेल याचा विचार त्यांनीच स्वत:च्या पातळीवर करावा तसेच तिथून बाहेर आल्यानंतर त्या अनुषंगाने आपापल्या पातळीवर कार्य करण्यास प्रारंभ करावा, असे विचार स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी व्यक्त केले. नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक पुरस्कृत व रामचंद्र प्रतिष्ठान संचालित निबंध व अन्य स्पर्धा आयोजित करण्यात आली, त्यात अनेक महिला व पुरुष स्पर्धकांनी भाग घेतला. त्यानंतर नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात आयोजित पारितोषिक वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्नुषा स्वामिनी सावरकर, कारागृहाचे अधीक्षक राजकुमार साळी, टी. एस. निंबाळकर, आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेत कर्मचारी वर्गानेही सहभाग घेतला होता. त्यांनाही पारितोषिक वितरण करण्यात आले. शिक्षक आकाश माळी यांनी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले. तुरुंगाधिकारी पल्लवी कदम यांनी प्रास्ताविक केले, तर आभार स्मारकाचे कार्यवाह राजेंद्र वराडकर यांनी मानले. सूत्रसंचालन रामचंद्र प्रतिष्ठानचे अशोक शिंदे यांनी केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर तसेच क्रांतिकार्यात सहभागी झालेल्यांचा आदर्श ठेवत आपल्यातील देशभक्तींचे विचार जीवनात उत्तरोत्तर वृद्धिंगत करण्यावर भर द्यावा, असे आवाहन अधीक्षक राजकुमार साळी यांनी केले. आजदेखील समाजासाठी विशेष काही करून दाखविण्याची क्षमता तुमच्यात असून, त्या अनुषंगानेही राष्ट्रपुरु षांच्या कार्यातून प्रेरणा घ्यावी, असेही त्यांनी सांगितले. या स्पर्धेचे परीक्षण केलेल्या स्वामिनी सावरकर यांनी स्पर्धकांच्या विचारांचे कौतुक केले तसेच त्यांना मार्गदर्शन केले.

Web Title:  Bandwars should use krishti for patriotism: Savarkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक