बाणगंगेला दुसºयांदा पूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 11:14 PM2017-10-09T23:14:34+5:302017-10-09T23:14:40+5:30

कसबे सुकेणे : दिंडोरी तालुक्यात आणि ओझर परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे बाणगंगेला यंदाच्या पावसाळ्यातील दुसरा महापूर आला. सोमवारी संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास बाणगंगेने धोक्याची पातळी गाठली. मौजे सुकेणेच्या पारापर्यंत पुराचे पाणी पोहचले.

 Banganga second phase | बाणगंगेला दुसºयांदा पूर

बाणगंगेला दुसºयांदा पूर

Next

कसबे सुकेणे : दिंडोरी तालुक्यात आणि ओझर परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे बाणगंगेला यंदाच्या पावसाळ्यातील दुसरा महापूर आला. सोमवारी संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास बाणगंगेने धोक्याची पातळी गाठली. मौजे सुकेणेच्या पारापर्यंत पुराचे पाणी पोहचले.
सोमवारी दुपारी साडेतीन वाजेनंतर दिंडोरी तालुक्यात बाणगंगेच्या पाणलोट क्षेत्रात सुमारे अडीच तास मुसळधार पाऊस झाला. ओझर, दीक्षी, सुकेणा परिसरापर्यंत पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे सोमवारी सायंकाळी बाणगंगेला यंदाच्या पावसाळ्यातील दुसरा मोठा पूर आला़ बाणगंगेच्या मोठ्या पुरामुळे दीक्षी, दात्याणे, ओणे, शिलेदारवाडी, खोल्या ओहोळ येथील लहानमोठ्या फरश्या व पूल पाण्याखाली गेल्याने या भागाचा संपर्क ओझर-सुकेणा रस्त्याशी तुटला़ या भागातील शेतीचे अतोनात नुकसान झाले असून, सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे व बाणगंगेच्या पूरपाण्यामुळे या भागातील शेकडो हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेल्याने अतोनात नुकसान झाले आहे़ कसबे सुकेणे व मौजे सुकेणे नदीकाठच्या भागात धांदल उडाली. सायंकाळी साडेसात वाजेनंतर बाणगंगेने रौद्र रूप धारण केले. कसबे सुकेणे येथील दाऊदशाहवली बाबा मंदिरासमोरच्या नागरी वस्तीत तसेच मौजे सुकेणेच्या पिंपळपार, हॉटेल, दुकानांना पुराच्या पाण्याचा वेढा होता. रात्री उशिरापर्यंत बाणगंगेची धोक्याची पातळी कायम होती. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर नैसर्गिक आपत्ती या भागावर ओढवली आहे.
अभोणा : गेल्या चार दिवसांपासून अभोणा शहरासह तालुक्यात सर्वदूर विजांच्या कडकडाटासह कोसळणाºया मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. परतीच्या मुसळधार पावसाने सोयाबीन, भात, मका, बाजरी आदी काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान होऊ लागले आहे. शेतकºयांनी उन्हाळ कांद्यासाठी टाकलेले बियाणे दबले जाण्याची शक्यता असून, उगवलेल्या कांदा रोपाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. वेधशाळेने वर्तविल्याप्रमाणे हा परतीचा पाऊस येत्या आठवड्यापर्यंत असाच कोसळत राहिला तर संपूर्ण खरीप हंगाम वाया जाण्याचा धोका तर असणारच त्याचबरोबर शेतकºयांना मोठा आर्थिक फटका बसणार असल्याचे जाणकार शेतकºयांनी सांगितले.दिंडोरी तालुक्यात रात्रभर पाऊसदिंडोरी : तालुक्यातील सर्व गावांमध्ये रविवारी रात्रभर पाऊस झाल्यानंतर सलग चौथ्या दिवशी सायंकाळी विजेच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला असून, यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. द्राक्षे, भाजीपाला व खरिपाच्या पिकांचे मोठे नुकसान होत असून, शेतकºयांच्या तोंडचा घास परतीचा पाऊस हिरावून घेत असल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. अनेक नदीनाल्यांना मोठे पूर आले. जानोरी येथे मोठा पूर आल्याने काही काळ वाहतूक बंद झाली होती. सध्या दिंडोरी तालुक्यातील काही द्राक्षबागा फुलोºयात असल्यामुळे कुज होण्याची शक्यता आहे. सतत पडणाºया पावसामळे द्राक्षवेलीची पाने जास्त काळ ओली राहिल्यास डावणी, करपा वाढणार आहे. त्याप्रमाणे या परिसरामध्ये टमाटा पीक जोरात होते; पंरतु या पिकाचेही नुकसान होणार आहे. तालुक्यात आता सोयाबीन, उडीद, मूग ही पिके काढणीला आली आहेत. रोज पडणाºया पावसामुळे या पिकांचे नुकसान होणार आहे. परतीच्या पावसामुळे शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकºयांनी नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी केली आहे.

Web Title:  Banganga second phase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.