बांगलादेशी तरुणी ‘ऊर्मी’ वात्सल्यमधून गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 01:21 AM2018-04-05T01:21:24+5:302018-04-05T01:21:24+5:30
शहरातील वात्सल्य महिला आधाराश्रमातून दोन मुली रविवारी (दि़ २) रात्री अचानक गायब झाल्याची घटना घडली आहे़ मेधा अशोक चव्हाण (१९) व ऊर्मी सिराजुल्ला इस्माईल (१९)अशी गायब झालेल्या मुलींची नावे असून, यापैकी ऊर्मी सिराजुल्ला इस्माईल हिने स्वत:ची कुंटणखान्यातून सुटका केली होती़ तसेच या गुन्ह्याबाबत सद्यस्थितीत न्यायालयीन प्रकियादेखील सुरू आहे़ दरम्यान, या मुलींच्या गायब होण्यामध्ये सेक्स रॅकेटमधील काही संशयितांचा सहभाग असल्याची तसेच ऊर्मीसोबत काहीतरी बरेवाईट झाल्याची चर्चा आहे़
नाशिक : शहरातील वात्सल्य महिला आधाराश्रमातून दोन मुली रविवारी (दि़ २) रात्री अचानक गायब झाल्याची घटना घडली आहे़ मेधा अशोक चव्हाण (१९) व ऊर्मी सिराजुल्ला इस्माईल (१९)अशी गायब झालेल्या मुलींची नावे असून, यापैकी ऊर्मी सिराजुल्ला इस्माईल हिने स्वत:ची कुंटणखान्यातून सुटका केली होती़ तसेच या गुन्ह्याबाबत सद्यस्थितीत न्यायालयीन प्रकियादेखील सुरू आहे़ दरम्यान, या मुलींच्या गायब होण्यामध्ये सेक्स रॅकेटमधील काही संशयितांचा सहभाग असल्याची तसेच ऊर्मीसोबत काहीतरी बरेवाईट झाल्याची चर्चा आहे़ विशेष म्हणजे, महिला पोलिसांची सुरक्षितता असताना हा प्रकार घडला असून, या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात केवळ हरविल्याची नोंद करण्यात आली आहे़ दरम्यान, सद्यस्थितीत वात्सल्यमध्ये ३० महिला व मुली असून, यापैकी केवळ या दोघीच कशा गायब झाल्या, वात्सल्यमधून त्या कशा आणि कधी बाहेर पडल्या याबाबत अधीक्षकांकडून माहिती दिली जात नाही़ तसेच यापूर्वीही वात्सल्यमधून मुली पळून गेल्या असून, त्यांची संख्या किमान पाच ते दहा अशी होती़ यावेळी मात्र दोनच मुली गायब झाल्याने त्यातही एक सेक्स रॅकेटमधील मूळ फिर्यादी असल्याने या रॅकेटमधील संशयितांना वाचविण्यासाठी तर त्यांना गायब करण्यात आले नाही ना याबाबत चर्चा सुरू आहे़ दरम्यान, वात्सल्य महिला वसतिगृहातील कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष व त्यांच्या शोधासाठी सरकारवाडा पोलिसांची उदासीनता याबाबत संशय निर्माण झाला आहे़ सिन्नर तालुक्यातील मुसळगाव येथील सेक्स रॅकेटमध्ये अडकल्यानंतर तब्बल सहा महिन्यांनंतर ऊर्मीने स्वत:च्या हिमतीने सुटका करून घेतली होती़ यानंतर मीडियासमोर येत ऊर्मीने मुसळगाव सेक्स रॅकेटचा पोलखोल करून सिन्नरमधील कुंटणखाना चालविणारी नानी गंगावणे, तिचा मुलगा विशाल गंगावणे व एकावर पोस्को तसेच विविध कलमांनुसार गुन्हे दाखल असून, ते कारागृहात आहेत. या प्रकरणाचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. याची न्यायालयीन प्रक्रिया सुरू असतानाच ही मुलगी गायब झाल्याने एकूण प्रकाराबाबत संशय व्यक्त केला जात आहे.