चौथ्या दिवशीही बॅँकेत गर्दी

By admin | Published: November 14, 2016 12:07 AM2016-11-14T00:07:36+5:302016-11-14T00:07:36+5:30

चौथ्या दिवशीही बॅँकेत गर्दी

Bank credit on fourth day | चौथ्या दिवशीही बॅँकेत गर्दी

चौथ्या दिवशीही बॅँकेत गर्दी

Next

ओझर टाऊनशिप : रद्द करण्यात आलेल्या ५०० व एक हजार रुपयांच्या नोटा बदलणे व खात्यात जमा करण्यासाठी आज चौथ्या दिवशीही नागरिकांनी पोस्ट कार्यालयासह चारही बँके बाहेर व्यवहार सुरू होण्यापूर्वीच रांग लावली होती. आज रविवार सुटी असल्याने तीन दिवसांच्या तुलनेत आज जास्त गर्दी होती.
येथील पोस्ट कार्यालयासह स्टेट बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ महाराष्ट्र, आयसीआयसीआय बँक व पंजाब नॅशनल बँकेच्या बाहेर नागरिकांनी मोठ मोठ्या रांगा लावल्या होत्या. आज रविवार सुटीचा दिवस असल्याने गेल्या तीन दिवसांच्या तुलनेत आज जास्तच गर्दी झाल्याने प्रत्येकाला अडीच ते तीन तास रांगेत उभे रहावे लागत होते. स्टेट बँकेत पाच काउंटर सुरू होते. पोस्ट कार्यालयात एक, तर पंजाब व आयसीआयसीआय बँकेत प्रत्येकी दोन काउंटर सुरू होते. काही झाले तरी आज बँकेतून नोटा बदलून घ्यावयाच्या किंवा खात्यात जमा करावयाच्या असा चंग बांधूनच अनेकांनी घरातून पाय काढला. चौथ्या दिवशीही प्रचंड गर्दी झाल्यामुळे बॅँक कर्मचाऱ्यांचे हाल झाले होते. मोठ मोठ्या रांगा लागल्याने ज्येष्ठ नागरिकांचे यात खूप हाल झाले. आठवड्याची एक दिवसाची रविवारची सुटीसुद्धा बँकेत नोटा जमा करणे, बदलणे या कामातच गेली असे कामगारांनी सांगितले. बॅँक प्रशासनानेही १००च्या नोटा न देता २००० च्या नवीन नोटा बदलून दिल्या आहेत. यामुळे बॅँकेतून बाहेर आलेल्या नागरिकांना दोन हजारचे सुटे कुठे मिळतील या काळजीनेही अनेकांना ग्रासलेले दिसून आले. (वार्ताहर)

Web Title: Bank credit on fourth day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.