संपामुळे बॅंक ग्राहकांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:15 AM2021-03-17T04:15:12+5:302021-03-17T04:15:12+5:30
--- भाजीपाल्याच्या दरात घसरण मालेगाव : बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक चांगली असली तरी ग्राहकांची गर्दी ओसरल्याने शेतकऱ्यांना कवडीमोल दराने भाजीपाला ...
---
भाजीपाल्याच्या दरात घसरण
मालेगाव : बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक चांगली असली तरी ग्राहकांची गर्दी ओसरल्याने शेतकऱ्यांना कवडीमोल दराने भाजीपाला विकावा लागत आहे. उन्हाच्या तीव्रतेने शेतकरी भाजीपाला काढून बाजारपेठेत विक्रीसाठी आणत आहेत. मात्र, कोरोनाच्या निर्बंधामुळे नागरिक घराबाहेर पडण्यास टाळाटाळ करीत असल्याने भाजीपाल्याचे दर कोसळले आहेत. शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
----
पाणपोयी सुरू करण्याची मागणी
मालेगाव : शहर परिसरात उन्हाच्या तीव्रतेत कमालीची वाढ झाली आहे. सर्वत्र पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. शहरातील सार्वजनिक पाणपोयी बंद अवस्थेत आहेत. वाटसरूंना पिण्याचे पाणी उपलब्ध होत नाही. विविध सामाजिक संस्थांनी उभारलेल्या पाणपोयी पूर्ववत सुरू कराव्यात, अशी मागणी केली जात आहे.
----
बाजार पेठेतील उलाढाल पुन्हा मंदावली
मालेगाव : कोरोनाच्या वाढत्या रूग्ण संख्येमुळे नागरिकांनी घराबाहेर पडण्यास टाळाटाळ केली आहे. परिणामी बाजारपेठेत पुन्हा मंदीचे वातावरण पसरले आहे. गेल्या काही दिवसांपासून व्यवसाय पूर्वपदावर येत होते. मात्र, शासनाने लावलेल्या नवीन निर्बंधांमुळे व्यापारीवर्ग अडचणीत आला आहे. सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत आस्थापना व दुकाने सुरू ठेवावी लागत आहेत.
-----
लोंबकळणाऱ्या वीज तारांची दुरुस्ती
मालेगाव : महापालिकेच्या प्रभाग ११ मध्ये महावितरण कंपनीकडून नवीन रोहित्र बसविण्यात आले आहे. तसेच लोंबकळणाऱ्या तारांची दुरुस्ती करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात विजेचा धक्का लागून तीन महिला जखमी झाल्या होत्या. या प्रकरणाची युवा सेनेचे जिल्हाप्रमुख विनोद वाघ व नगरसेवक मदन गायकवाड यांनी गंभीर दखल घेत महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. कर्मचाऱ्यांनी नवीन रोहित्र व घरापासून जवळ जाणाऱ्या तारा सहा ते सात फुटांपर्यंत लांब करण्यात आल्या आहेत. यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.