वेतनात केवळ दोन टक्क्यांची वाढ केल्याच्या निषेधार्थ बँक कर्मचाऱ्यांचा आजपासून संप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 01:02 AM2018-05-30T01:02:58+5:302018-05-30T01:02:58+5:30

बँक कर्मचाºयांच्या वेतनात केवळ दोन टक्क्यांची वाढ केल्याच्या निषेधार्थ देशभरातील बँकांचे कर्मचारी बुधवारी (दि.३०) व गुरुवारी (दि.३१) दोन दिवसांच्या संपावर जाणार आहे. या संपात नाशिक जिल्ह्यातील पाच विभागीय कार्यालयांसह ४२५ शाखांचे जवळपास साडेतीन हजार बँक कर्मचारी व अधिकारी संपावर जाणार असून, संपकाळात चेकची वटणावळ बंद राहणार असून, पहिल्याच दिवशी एटीमही कोरडी पडण्याचा दावा बँक कर्मचारी संघटांच्या प्रतिनिधींनी केला आहे. त्यामुळे जिल्हाभरातील बँकांचे कोट्यवधींचे व्यवहार ठप्प होणार आहे.

The bank employees are in touch with the increase of only two percent in salary | वेतनात केवळ दोन टक्क्यांची वाढ केल्याच्या निषेधार्थ बँक कर्मचाऱ्यांचा आजपासून संप

वेतनात केवळ दोन टक्क्यांची वाढ केल्याच्या निषेधार्थ बँक कर्मचाऱ्यांचा आजपासून संप

Next

नाशिक : बँक कर्मचाºयांच्या वेतनात केवळ दोन टक्क्यांची वाढ केल्याच्या निषेधार्थ देशभरातील बँकांचे कर्मचारी बुधवारी (दि.३०) व गुरुवारी (दि.३१) दोन दिवसांच्या संपावर जाणार आहे. या संपात नाशिक जिल्ह्यातील पाच विभागीय कार्यालयांसह ४२५ शाखांचे जवळपास साडेतीन हजार बँक कर्मचारी व अधिकारी संपावर जाणार असून, संपकाळात चेकची वटणावळ बंद राहणार असून, पहिल्याच दिवशी एटीमही कोरडी पडण्याचा दावा बँक कर्मचारी संघटांच्या प्रतिनिधींनी केला आहे. त्यामुळे जिल्हाभरातील बँकांचे कोट्यवधींचे व्यवहार ठप्प होणार आहे. बँक कर्मचाºयांच्या मागणीवर तोडगा काढण्यासाठी आणि संप होऊ नये, यासाठी मुख्य कामगार आयुक्तांनी कर्मचारी आणि इंडियन बँक्स असोशिएशनच्या सदस्यांसमवेत बँक कर्मचारी व अधिकारी युनियनच्या प्रतिनिधींची बैठक झाली. परंतु या बैठकीत कर्मचाºयांच्या वेतनात केवळ दोन टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव आयबीएने पुढे रेटल्यामुळे कर्मचारी आणि अधिकाºयांच्या संघटनांनी संपाचा निर्णय घेतला असून देशभरातील सार्वजनिक क्षेत्रांतील राष्ट्रीयीकृत बँकांचे कर्मचारी व अधिकारी यांचे प्रतिनिधित्व करणाºया युनायटेड फोरम आॅफ बँक युनियनने (यूएफबीयू) बुधवारपासून दोन दिवसीय देशव्यापी संपाची हाक दिली आहे. इंडियन्स बँक्स असोसिएशनतर्फे वेतन करारास विलंब होत असल्याचा आरोप करत युनायटेड फोरम्स आॅफ बँक युनियन्सने ३० व ३१ मे रोजी देशव्यापी संपाची हाक दिली असून, बुधवारी ३० मे रोजी सकाळी ६ वाजतापासून सुरू होणाºया या संपात देशभरातून दहा लाखांहून जास्त सभासद, बँक कर्मचारी, अधिकारी सहभागी होणार आहेत.  पगारात पुरेशी वाढ आणि इतर सेवाशर्तीत योग्य ते सुधार करण्याची मागणी बँक कर्मचाºयांनी केली असून, ही नवीन वेतनवाढ १ नोव्हेंबर २०१७ पासून होणे अपेक्षित होते. मात्र, वेतन करारास सात महिन्यांहून अधिक उशीर झाल्याने व इंडियन्स बँक्स असोसिएशनच्या उदासीन भूमिकेमुळे बँक कर्मचारी व अधिकाºयांना संपावर जावे लागत असण्याची माहिती फोरमच्या प्रतिनिधींनी दिली.

Web Title: The bank employees are in touch with the increase of only two percent in salary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.